ETV Bharat / state

शेजार धर्माला काळिमा; 3 वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न, नराधमास अटक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 10:56 PM IST

Rape Attempt In Bhiwandi : शेजारी राहणाऱ्या एका 32 वर्षीय आरोपीने 3 वर्षांच्या चिमुकल्या मुलीला मारहाण करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. (Abuse of girl) मात्र, शेजारील युवकाच्या प्रसंगावधानाने आरोपीला चाप बसला. यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Rape Attempt In Bhiwandi
3 वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न

ठाणे Rape Attempt In Bhiwandi : शेजार धर्माला काळिमा फासणारी धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी ठाण्यात घडली आहे. (Kongaon area) ही घटना भिवंडी तालुक्यातील कोनगाव परिसरातील एका सोसायटीच्या टेरेसवर घडली आहे. ३२ वर्षीय आरोपीने शेजारील ३ वर्षीय मुलीला इमारतीच्या टेरेसवर घेऊन जात तिला मारहाण करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन अटक केली आहे. (beating of girl)

आरोपीचा पळण्याचा प्रयत्न फसला : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पीडित बालिकेचे आई-वडील कामावर असताना ३२ वर्षीय आरोपी शेजाऱ्याने बालिकेच्या बालमनाचा फायदा घेत तिला बळजबरीने इमारतीच्या टेरेसवर नेले. त्यानंतर पीडितेला मारहाण करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यासह तिचे कपडे काढून तिला अर्धनग्न करीत तो तिच्यावर अतिप्रसंगाच्या तयारीत होता; मात्र त्यावेळी इमारतीत राहणाऱ्या अन्य एका तरुणाने त्यास गैरकृत्याच्या प्रयत्नात असताना पाहिले. त्यावेळी नराधमाने टेरेसवरून उडी मारत पळून जाण्याचा प्रयत्न करत पहिल्या मजल्यावरून खिडकीतून उडी घेतली. त्यामुळे त्याचा उजवा हात मुरगळत फॅक्चर झाला.

आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल : या घटनेनंतर जमावाकडून आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले गेले. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून नराधमाच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात भादंविच्या ३५४ (अ)(ब) सह पोक्सोन्वये गुन्हा दाखल करून त्यास बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आश्लेषा घाटगे करीत आहेत. आज (बुधवारी) नराधमाला भिवंडी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक आश्लेषा घाटगे यांनी दिली आहे. तर दुसरीकडे या घडलेल्या घटनामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तर काही पालकवर्ग या घटनेमुळे आपल्या पाल्याची सुरक्षा बाबत चिंता व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा:

  1. बावनकुळे स्पष्टच बोलले, सुशीलकुमार शिंदेंना भाजपाने कसलीही ऑफर दिली नाही
  2. मुख्यमंत्र्यांनी दावोसला दलाल नेले; मुख्यमंत्री शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर अंबादास दानवेंची टीका
  3. नाशिक महानगरपालिकेला शहरात 'आपला दवाखान्यां'ना जागा मिळतं नसल्यानं 10 कोटी परत जाणार?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.