ETV Bharat / state

समलैंगिक संबंधातून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याची हत्या

author img

By

Published : Sep 15, 2020, 5:25 PM IST

homosexual
समलैंगिक

मुंबईमध्ये दोन तरुणांनी मिळून महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याची हत्या केली. समलैंगिक संबंधातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली आहे.

मुंबई - समलैंगिक संबंधातून मुंबई महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या झाल्याचे समोर आले. 28 ऑगस्ट रोजी एक 46 वर्षीय व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.

व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी तपास केला असता या व्यक्तीचे शेवटचे मोबाईल लोकेशन भिवंडी येथील जंगलात आढळून आले. त्या व्यक्तीसोबत आणखी दोन मोबाईल लोकेशनही पोलिसांना आढळले. यातील एका 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. या तरुणाने सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्या तरुणाने गुन्ह्याची कबुली दिली. मयत 46 वर्षीय व्यक्तीसोबत त्याचे समलैंगिक संबंध सुरू होते. त्या दोघांची ओळख समाज माध्यमावर झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये समलैंगिक संबंध सुरू झाले होते.

या तरुणाचे कुटुंबीय त्याचे लग्न ठरवत असल्यामुळे त्याने समलैंगिक संबंध थांबवण्यासाठी मृत व्यक्तीला विनंती केली होती. विनंती करूनही मृत व्यक्ती ऐकत नसल्यामुळे आरोपी तरुणाने त्याच्या 21 वर्षीय मित्रासोबत मिळून मृत व्यक्तीला भिवंडी येथे बोलवून चाकूने वार करून त्याचा खून केला. नंतर त्याच्यावर पेट्रोल ओतून त्याचा मृतदेह पेटवून दिला. यासंदर्भात पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला असून दोन्ही आरोपींना 19 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवले आहे. मृत व्यक्ती महानगरपालिकेचा विरिष्ठ अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.