ETV Bharat / state

Ashish Shelar Criticized MVA : उद्धव ठाकरेंच्या काळात घरभरणी झाली, आशिष शेलारांची टीका

author img

By

Published : Jan 19, 2023, 6:38 PM IST

Updated : Jan 19, 2023, 7:27 PM IST

Ashish Shelar Criticized MVA
Ashish Shelar Criticized MVA

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अनेक प्रक्लपांचे भूमीपूजन आणि उद्घाटन झाले. या कामांवरुन आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. उद्धव ठाकरेंच्या काळात घरभरणी झाली, तर शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात विकासाची पायाभरणी होत आहे, असा खोचक टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे.

मुंबई - भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी आज उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. याकूबची कबर सजवणे, मनसुख हिरेनची हत्या, दाऊदच्या मालमत्तांची खरेदी, बदल्यांमध्ये वसूली आणि सचिन वाझे, रस्त्यावर खड्डे, नाले सफाईत भ्रष्टाचार, कोविडमध्ये नातेवाईकांची भलामण, मेट्रो कारशेड रखडवणे या सर्वात महाविकास आघाडीचे नेते सहभागी असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंच्या काळात घरभरणी झाली, तर शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात विकासाची पायाभरणी होत आहे, असा खोचक टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे.

शिंदे-फडणवीस येताच विकासाला गती - आज भारत अभूतपूर्व सकारात्मक उर्जेने काम करत आहे. आजपर्यंत फक्त गरिबीची चर्चा झाली. मात्र, आम्ही आता प्रत्यक्ष काम करत आहोत. सध्या देशात एका बाजूला घर, बाथरूम, लाईट, मोफत उपचार, गॅस, पाणी या सुविधांचा विकास होत आहे. तर, दुसरीकडे आधूनिक संसाधनांचाही मोठ्या प्रमाणता विकास होत आहे असा दावा यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. ते आज बीकेसी मैदानातून जनतेला संबोधिक करताना बोलत होते. दरम्यान, काही काळ महाराष्ट्राचा विकास थांबला होता. मात्र, शिंदे-फडणवीस यांची जोडी येताच विकासाला गती आली आहे असे म्हणत पंतप्रधानांनी ठाकरे सरकारवर टीका करत नवीस सरकारचे अभिनंदन केले आहे.

ईच्छाशक्तीची काहीही कमी नाही : येणारऱ्या काळात धारावी पुनर्विका, मेट्रो यासर अनेक विकास कामे होणार आहेत. त्या सर्व कामे लक्षात घेऊन मी शिंदे-फडणवीस याचे अभिनंदन करतो. आज सरकार हे डबल इंजिन आहे. त्यामुळे कामे वेगाने होत आहेत. वाहतूकीबाबतही देशात काम सुरू आहे. तसेच, शहरातील कचरा प्रश्नही आधुनिक संसाधनांचा वापर करत लवकरच त्याच्यावर काम होणार आहे. याममध्ये संसाधनांची आणि ईच्छाशक्तीची काहीही कमी नाही. असही ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्राचा विकास वेगाने होणार : येणारऱ्या काळात धारावी पुनर्विका, मेट्रो यासर अनेक विकास कामे होणार आहेत. त्या सर्व कामे लक्षात घेऊन मी शिंदे-फडणवीस याचे अभिनंदन करतो. आज सरकार हे डबल इंजिन आहे. त्यामुळे कामे वेगाने होत आहेत. वाहतूकीबाबतही देशात काम सुरू आहे. तसेच, शहरातील कचरा प्रश्नही आधुनिक संसाधनांचा वापर करत लवकरच त्याच्यावर काम होणार आहे. याममध्ये संसाधनांची आणि ईच्छाशक्तीची काहीही कमी नाही. असही ते म्हणाले आहेत.

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावरून आरोप प्रत्यारोप : मुंबई शहरांचा विकास करताना स्थानिक शासनाचीही तशीच मानसिकता पाहिजे. दोन्ही जागेवर एकाच विचारांचे सरकार पाहिजे असे म्हणत मुंबई मनपातही भाजपचीच सत्ता असती तर विकास आणखी वेगात झाला असता असा पंतप्रधानांनी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. परंतु, पैसा असतानाही तो खर्च न होणे हे योग्य नाही. भाजपची सरकार असो किंवा आणखी कोणती असो आम्ही विकासाच्या आड राजकारण आणत नाहीत. विकासाचे राजकारण करतो. असे म्हणत पंतप्रधानांनी अप्रत्यक्ष शिवसेनेवर टीका केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी आज मुंबईत आले आहेत. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर ठाकरे गट जोरदार हल्लाबोल करत आहे.

हेही वाचा - Mumbai Will Completely Transformed Said CM Shinde : तीन वर्षात मुंबईचा संपूर्ण कायापालट करणार; महाविकास आघाडीवर मुख्यमंत्र्यांची सडकून टीका

Last Updated :Jan 19, 2023, 7:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.