ETV Bharat / state

Ashish Shelar On Uddhav Thackeray : अफजल खान तुमचा पाहुणा होता का? आशिष शेलारांचा खोचक सवाल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2023, 8:44 PM IST

Ashish Shelar On Uddhav Thackeray Group: राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाले असून इंग्लंड (Aditya Thackeray) येथील अल्बर्ट म्युझियम मधून ते ऐतिहासिक वाघनख भारतात आणणार आहेत. या विषयावर आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टिपणीवरून (Ashish Shelar) राजकारण तापले आहे. यावर बोलताना भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलारांनी उद्धव ठाकरे गटावर निशाना साधत अफजल खान तुमचा पाहुणा लागतो काय? असा प्रश्न विचारला आहे. मुंबई भाजपा कार्यालयात ते आज (सोमवारी) बोलत होते. (Waghnakh Issue)

Ashish Shelar On Uddhav Thackeray Group
आशिष शेलारांचा उद्धव ठाकरे गटाला प्रश्न

वाघनखांवरून आशिष शेलारांची उद्धव ठाकरे गटावर टीका

मुंबई Ashish Shelar On Uddhav Thackeray Group: भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार म्हणाले की, हा जो काही प्रकार सुरू आहे तो फारच हास्यास्पद आहे. अफजखानाचा कोथळा काढणारी वाघनखं भाजपा आणत असल्यामुळे पेंग्विन कुटुंबाच्या पोटात दुखत आहेत. याच कारणाने नकली वाघ आता पुरावे मागत असून उबाठाची लोकं ही वारंवार छत्रपती आणि त्यांच्या परिवाराबाबत विविध प्रश्न उपस्थित करत आहेत. म्हणून ही सगळी नकली वाघं असून कुठल्या मतांसाठी हे असे करत आहेत? हा प्रश्न आहे. आदित्य ठाकरे यांचे विषय पेग, पेंग्विन आणि पार्टी हे आहेत. पब मधल्या विषयांचा थयथयाट कधीही रस्त्यावर करायचा नसतो.


'त्यांची' भूमिका ही केवळ मतांसाठी: विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना आशिष शेलार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा सन्मान होणार असेल तर त्यात काय चूक आहे? आम्ही मतासाठी कुठलीही गोष्ट करत नसून वडेट्टीवार तुमचे सरकार मागील ५० वर्षे सत्तेत होते. जे तुम्हाला जमले नव्हते ते आज महायुती सरकार करत आहे. म्हणूनच तुम्ही प्रश्न विचारत आहात. पण, प्रश्न विचारून तुम्ही कुठली मतं मिळवू पाहत आहात? परंतु जनता भोळी नाही. छत्रपतींच्या शौर्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना तुम्ही स्वतः बरोबर आदित्य ठाकरेंना सुद्धा हिरवी चादर दिली आहे का? असाही सवाल शेलार यांनी केला. तसेच उबाठाची बदललेली भूमिका ही केवळ मतांसाठी आहे, असेही ते म्हणाले.

दक्षिण मुंबईतील जागा भाजपा जिंकणार: भाजपाने लोकसभेसाठी महाराष्ट्रात 'मिशन ४५' हाती घेतले आहे. दक्षिण मुंबईतील लोकसभेच्या जागे विषयी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा दक्षिण मुंबईत पराभव ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तसेच मागच्या निवडणुकीत ते आमच्या मेहरबानीने जिंकले होते. त्यांचे कर्तृत्व नव्हते. तरीसुद्धा अरविंद सावंत मोदींचे पोस्टर घेऊन मतदार संघात फिरले म्हणून ते जिंकले. अन्यथा, त्यांचा चेहरा दक्षिण मुंबईत कुणालाही माहीत नव्हता. कर्तुत्ववान नसलेल्या माणसाला सुद्धा जिंकवण्याची ताकद मोदींजींच्या नावात असून त्यामुळेच सावंत यांचा विजय झाला. याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभिकरण करणारे आता कबरीवर फिरून मत मागताना दिसत आहेत. पूर्ण मुंबईतल्या ६ जागा आम्ही जिंकणार असून दक्षिण मुंबईची जागा आम्ही मोठ्या फरकाने जिंकू, असा विश्वासही शेलारांनी व्यक्त केला.


संजय राऊतांवर बोचरी टीका: संजय राऊत यांच्याविषयी बोलताना शेलार म्हणाले की, संजय राऊत हे बोलताना चिलीम आणि लिहिताना गांजा घेऊन बसतात. त्यामुळे कुणीही बुद्धिमान व्यक्ती त्यावर उत्तर देणार नाही. त्याचप्रमाणे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला द्यायचा हा सर्वस्वी निर्णय महापालिकेचा आहे, असेही शेलार म्हणाले.

हेही वाचा:

  1. Chhagan Bhujbal : मला एकट्याला टार्गेट केलं जातंय - छगन भुजबळ
  2. MNS Loksabha Election २०२४ : लोकसभेसाठी 'मनसे'ची प्लॅनिंग; 'या' दोन मतदारसंघांवर नजर?
  3. Aaditya Thackeray Criticizes BJP : माझा तुम्ही 'बाळ' असा उल्लेख केला याचा अभिमान; आदित्य ठाकरेंची भाजपावर टीका
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.