ETV Bharat / state

Donation To IIT Bombay: आयआयटी बॉम्बेला माजी विद्यार्थ्यांकडून 1अब्ज 500 कोटी रुपयांची देणगी; 'या' कामासाठी होणार वापर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 10:32 PM IST

Donation To IIT Bombay
आयआयटी बॉम्बे

मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेला 1अब्ज 500 कोटी रुपये देणगी माजी विद्यार्थ्यांकडून देण्यात आली आहे. याचा वापर हरित ऊर्जा आणि शाश्वतता संशोधन केंद्राच्या स्थापनेसाठी केला जाणार आहे. त्याचप्रमाणे भारतात नवीन तंत्र नवीन शोध विकास करण्यासाठी हा निधी खर्च केला जाईल. जागतिक पातळीवर IIT बॉम्बे 149 क्रमांकावर तर अभियांत्रिकीमध्ये 47 व्या क्रमांकावर आहे.

मुंबई: आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईकरिता सुमारे एक अब्ज पाचशे कोटीपेक्षा अधिक रुपयांची देणगी देऊन परतफेड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही देणगी शाश्वत हरित ऊर्जा यासाठी तसेच हवामान बदलावर उपाययोजना शोधण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे.


सहा दशकात 70 हजार संशोधक: जगभर हवामान बदलामुळे सर्व राष्ट्र चिंतेत आहे. त्याबाबत प्रत्येक देश आपल्या परीने हवामान बदलावर काम करत आहे. हवेमध्ये प्रचंड प्रमाणात कार्बन डाय-ऑक्साइड सोडला जातो आणि त्याच्यामुळे मानव जातीला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्याचं कारण ओझोन वायू सह पृथ्वीवरील वातावरणामध्ये विनाशकारी बदल होत असल्याचं जगातील शास्त्रज्ञांनी अहवालाद्वारे व्यक्त देखील केलाय. म्हणूनच आयआयटी मुंबई कडून हवामान बदल आणि त्याचे कृषी क्षेत्रावर मानव जातीवर होणारे पर्यावरणीय परिणाम याबाबत अभ्यास या देणगीच्या माध्यमातून केला जाणार आहे. आयआयटी मुंबईने सहा दशकात 70,000 अभियंते संशोधक आणि शास्त्रज्ञ दिलेले आहेत. या संस्थेत 715 प्राध्यापक कार्यरत आहेत. पहिल्या पंतप्रधानांनी विज्ञानाची मुहूर्तमेढ रोवली आणि आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्या माजी विद्यार्थ्यांनीच भली मोठी देणगी देऊन भारताच्या विकासासाठी योगदान दिलेले आहे.

भारत मागे राहता कामा नये: जगातील अनेक देश आता हरित ऊर्जेमध्ये संशोधन आणि विकास यांच्या मागे लागलेले आहे. भारत देखील यामध्ये मागे राहता कामा नये. म्हणून भारताकडे उपलब्ध असलेली साधनसामग्री आणि जैवविविधता तिला टिकवणे, तिचा विकास करणे यासाठी आयआयटी मुंबईमध्ये हरित ऊर्जा आणि शाश्वत ऊर्जेचे संवर्धन करण्यासाठी हे विशेष संशोधन केले जाणार आहे. यासाठी खास केंद्र देखील उभारले जाणार आहे.

ईर्षाळवाडी घटनांचा शोध घेणार: आयआयटी मुंबईमध्ये बॅटरी तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे. सौर
फोटोवोल्टाईक्स तसेच जैवइंधन स्वच्छ वायू विज्ञान यावर देखील संशोधन केले जाणार आहे. पूर किंवा ईर्षाळवाडी डोंगर दुर्घटना, अचानक होणारी ढगफुटी अशा सर्व हवामान बदलातील घटकांवर संशोधन करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध येथे केल्या जातील. त्यासाठी एक हब विकसित देखील केले जाईल.


काय म्हणाले संचालक? यासंदर्भात ईटीव्ही भारत सोबत आयआयटी मुंबईचे संचालक प्राध्यापक सुभाषिस चौधरी यांनी म्हटले आहे की, "आमच्या आयआयटीमधून हजारो विद्यार्थी संशोधक शास्त्रज्ञ म्हणून जगामध्ये काम करत आहे. त्यांनी त्यांच्या कामातून संस्थेसाठी उदार मनाने मोठे योगदान दिलेले आहे, ते अनमोल आहे. या देणगीचा उपयोग नवीन संशोधकांची फळी पुढे येण्यासाठी होईल. तसेच जागतिक हवामान संकटावर नाविन्यपूर्ण उपाय, शोधण्यासाठी केला जाईल. यामुळेच हरित ऊर्जा आणि शाश्वत संशोधन केंद्र भविष्यात आयटी मुंबईमध्ये आकाराला येईल. आजचे विद्यार्थी माजी विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन सातत्याने संशोधनाने विकास करत राहतील.

हेही वाचा:

  1. IIT Bombay Top 150 : आयआयटी मुंबईची भरारी, जागतिक विद्यापीठ क्रमवारीत घेतली मोठी झेप
  2. आयआयटी-बॉम्बेच्या प्राध्यापकाने तयार केलेल्या कोविड टेस्टिंग किटला डीसीजीआयची मान्यता
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.