ETV Bharat / state

नवाब मलिक का ठरत आहेत अजित पवारांची डोकेदुखी?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2023, 4:07 PM IST

Ajit Pawar On Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक सध्या अजित पवार (Ajit Pawar) गटाची डोकेदुखी ठरत आहेत, असं मानण्यात येतं. नवाब मलिक (Nawab Malik) यांना सोडताही येत नाही आणि धरता ही येत नाही, अशी अवस्था अजित पवार गटाची झाली आहे. नवाब मलिक मात्र अजित पवार गटाशीच आपली जवळीक असल्याचे कृतीतून दाखवत आहेत. त्यामुळे दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर नाचण्यापेक्षा अजित पवार गटाने भाजपात विलीन व्हावे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने केली आहे.

Ajit Pawar On Nawab Malik
नवाब मलिक

नवाब मलिकांविषयी मत व्यक्त करताना राजकीय विश्लेषक

मुंबई Ajit Pawar On Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांना मंत्रिपदी विराजमान करण्यात आले. (NCP Sharad Pawar faction) यामध्ये भाजपाच्या वतीनं ज्यांच्यावर प्रचंड टीका केली अशा आमदारांचाही समावेश आहे; मात्र अन्य आमदारांबाबत भाजपाने घेतलेली नरमाईची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या बाबत घेण्यास भाजपा तयार नाही. भाजपाने नवाब मलिक यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे आरोप असल्याने त्यांना महायुतीत सामावून घेता येणार नाही, असे पत्राद्वारे अजित पवार यांना कळवले. (BJP policy on Nawab Malik) त्यानंतर अजित पवार यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. दरम्यान, नवाब मलिक यांनी मंगळवारी रात्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली आणि चर्चा केली. यामुळे पुन्हा एकदा नवाब मलिक यांच्या समावेशाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

सामावूनही घेता येत नाही, दूरही सारता येत नाही : अजित पवार आणि नवाब मलिक यांची ही भेट मतदार संघातील विकास कामांबाबत होती असे नवाब मलिक यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी हे अजित पवार गटासाठी डोकेदुखी ठरत आहे. नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्यासोबत असलेली निष्ठा आणि पक्षासाठी केलेले काम पाहता त्यांना दूर करता येत नाही आणि भाजपाच्या धोरणामुळे त्यांना महायुतीतही सामावून घेता येत नाही, अशी कोंडी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची झाली आहे.


अजित पवार गट भाजपात विलीन करा : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे म्हणाले की, नवाब मलिक यांच्यासारख्या अभ्यासू आणि ज्येष्ठ आमदाराची भाजपाच्या अटीमुळे ससेहोलपट होत आहे. नवाब मलिक यांच्यासारख्या आमदाराला मिळत असलेली वागणूक ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवाब मधील यांनी केलेल्या टीकेचा हा राग आहे; मात्र भाजपाच्या इशाऱ्यावर नाचण्यापेक्षा अजित पवार गटाने आता थेट भाजपामध्ये विलीन व्हावे अशी प्रतिक्रिया लवांडे यांनी व्यक्त केली.


फडणवीस यांच्यावरील टीकेचा परिणाम : या संदर्भात बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषण आनंद गायकवाड म्हणाले की, नवाब मलिक यांना महायुतीत सामावून घ्यायला नकार देणाऱ्या भाजपाने यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांना सामावून घेतले आहे. भाजपा हा अन्य पक्षातील कलंकित मंत्र्यांना आपल्या पक्षात घेऊन स्वच्छ करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो आहे. अन्य पक्षातील अनेक नेते केवळ आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून भाजपात दाखल झाले हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना होत असलेला विरोध हा तात्त्विक विरोध नसून देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबावर नवाब मलिक यांनी केलेल्या टीकेचा हा परिणाम आहे, असे गायकवाड म्हणाले. एकूणच नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी आणि आगामी निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो या धास्तीने डोकेदुखी ठरत आहेत हे निश्चित.

हेही वाचा:

  1. रस्ताच नाही सांगा कसा साधायचा 'विकास'; मेळघाटातील अतिदुर्गम गावातील आदिवासी महिलांचा टाहो
  2. रस्ताच नाही सांगा कसा साधायचा 'विकास'; मेळघाटातील अतिदुर्गम गावातील आदिवासी महिलांचा टाहो
  3. वाहनांवरील जुनं ई-चलन भरून 90 टक्क्यांपर्यंत सुट मिळवा; 'या' राज्यानं आणली भन्नाट योजना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.