ETV Bharat / bharat

वाहनांवरील जुनं ई-चलन भरून 90 टक्क्यांपर्यंत सुट मिळवा; 'या' राज्यानं आणली भन्नाट योजना

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2023, 2:28 PM IST

Discount on Pending Challans
Discount on Pending Challans

Discount on Pending Challans : तेलंगणा राज्य सरकारनं वाहन चालकांना दिलासा देणारी एक भन्नाट योजना आणलीय. वाहनांवरील जुनं ई-चलन भरा आणि 90 टक्क्यांपर्यंत सुट मिळवा अशी ही योजना आहे.

हैदराबाद Discount on Pending Challans : तेलंगणाच्या नव्या काँग्रेस सरकारनं जुनं वाहतूक ई-चलन सवलतील भरण्याची अनोखी संधी दिलीय. लोकांना हवं असल्यास ते त्यांचं जुनं चलान 90 टक्क्यांपर्यंत सूट देऊन भरू शकतात. मंगळवारपासून ही योजना सुरू झालीय. तेलंगणा सरकारनं मंगळवारी या योजनेची घोषणा केलीय. तेलंगणा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात 30 डिसेंबर रोजी मेगा लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलंय. याआधी सरकारनं जुन्या वाहतूक चलानाचा निपटारा करण्याची संधी दिलीय. ही योजना 10 जानेवारी 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. यात लोक ई-चलन वेबसाइटवर जाऊन त्यांचं थकलेलं चलन (दंडाची रक्कम) सवलतीसह भरू शकणार आहेत.

कोणत्या वाहनांवर किती टक्के सुट : थकलेल भरताना देण्यात येणारी सवलत ही वाहन श्रेणीवर अवलंबून असणार आहेत. पुश गाड्या आणि तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाच्या बसला दंडाच्या रकमेवर 90 टक्के सूट मिळेल. म्हणजे फक्त 10 टक्के रक्कम भरुन ते जाऊ शकतात. मोटारसायकल-स्कूटर आणि तीनचाकी किंवा ऑटो-रिक्षा चालकांना दंडाची रक्कम भरल्यास 80 टक्के सूट मिळणार आहे. म्हणजे त्यांना 100 पैकी फक्त 20 रुपये द्यावं लागतील. कार आणि मिनी ट्रक, ट्रक, बस इत्यादी वाहनांना चलनाच्या रकमेवर 60 टक्के सूट मिळणार आहे. म्हणजे जर त्यांच्याकडे 1000 रुपयांचं चलान असेल तर त्यांना फक्त 400 रुपये भरावे लागणार आहेत.

निवडणूक जाहिरनाम्यात दिलं होतं आश्वासन : काँग्रेसनं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात वाहतूक चलानात सूट देऊन वाहनचालकांना दिलासा देण्याचं आश्वासन दिलं होतं. या आश्वासनाची आता पूर्तताही झालीय. लोकांना तेलंगणा ट्रॅफिक ई-चलान वेबसाइटवर जाऊन त्यांच्या वाहनांचं थकित चलान तपासून सवलतीची रक्कम ऑनलाइन भरावी असं आवाहन करण्यात आलंय. राज्यभरात दोन कोटींहून अधिक वाहतूक चलान थकित असल्याचा अंदाज आहे. 31 मार्च 2022 पर्यंत 2.4 कोटी रुपये चलन वाहन चालकांनी थकविलं होते.

हेही वाचा :

  1. License Canceled For Wrong Side Driving: सावधान! एका दिवसात 104 वाहन चालकांचे लायसेन्स रद्द; 'ही' चूक ठरली कारणीभूत
  2. Mumbai Traffic Police : तळीरामांनो सावधान! मुंबई वाहतूक पोलीस वापरणार ब्रेथ एनालाइजर; मद्यपींना वचक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.