ETV Bharat / state

अनिल देशमुख प्रकरण: अॅड. जयश्री पाटील ईडी कार्यालयात नोंदवणार जबाब

author img

By

Published : May 19, 2021, 1:23 PM IST

अॅड. जयश्री पाटील ईडी कार्यालयात नोंदवणार जबाब
अॅड. जयश्री पाटील ईडी कार्यालयात नोंदवणार जबाब

पोलीस खात्याचे तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर या संदर्भात सीबीआयकडून गुन्हा नोंदवला गेला होता. अनिल देशमुख यांची नागपूर येथील निवासस्थानी तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणात ई़डीने जयश्री पाटील यांना समन्स बजावले होते.

मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सध्या सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. त्यानंतर ईडीनेही देशमुखांची चौकशी सुरू केली होती. या प्रकरणी आता जयश्री पाटील या जबाब नोंदवण्यासाठी आज ईडी कार्यालयात हजर होणार आहेत. अनिल देशमुख यांच्या विरोधात केलेल्या आरोपानंतर जबाब नोंदवण्यास जयश्री पाटील ईडी कार्यालयात येणार आहेत. अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने यापूर्वी जबाब नोंदवला आहे.

पोलीस खात्याचे तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर या संदर्भात सीबीआयकडून गुन्हा नोंदवला गेला होता. अनिल देशमुख यांची नागपूर येथील निवासस्थानी तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली होती. चौकशीअंती ईडीने अनिल देशमुख यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग संदर्भातील गुन्हा दाखल केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.