ETV Bharat / state

Action against Narco Terrorists: एटीएसची नार्को दहशतवादावर करडी नजर, ललित पाटील प्रकरणात १० पोलीस निलंबित

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 9:54 PM IST

Action against Narco Terrorists
एटीएस पीसी

Action against Narco Terrorists: महाराष्ट्रातील ड्रग्ज तस्करीबाबत मागील एका वर्षात तसेच 2022 च्या तुलनेत किती कारवाया झाल्या, किती जणांना अटक करण्यात आली तसेच अंमली पदार्थांच्या विरोधात (Action against Narco Terrorists) सरकार, पोलीस आणि समाजाची भूमिका आज राज्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था संजय सक्सेना यांनी पत्रकारांच्या माध्यमातून माहिती दिली. (Drug Trafficking) एटीएसची आता नार्को दहशतवाद्यांवर करडी नजर असणार आहे.

अंमली पदार्थ विरोधी कारवायांविषयी माहिती देताना एटीएस प्रमुख

मुंबई Action against Narco Terrorists: अंमली पदार्थांच्या विरोधात राज्य सरकारच्या राज्य अंमली पदार्थ विरोधी दलाची स्थापना होणार आहे. अंमली पदार्थ तस्करांवर ATS धडक कारवाई करेल. तसेच मालमत्तांवर छापे टाकून अंमली पदार्थ तस्करांचे रॅकेट उद्ध्वस्त करेल. ATS ची नार्को-दहशतवादावर करडी नजर आहे. पुढे एटीएस प्रमुख सदानंद दत्ता म्हणाले की, अंमली पदार्थांच्या व्यसनाबद्दल लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. या पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर विभागीय कारवाई करण्यात येणार आहे. (ATS PC Mumbai)

'ही' आहे कारवाईची आकडेवारी: एटीएस प्रमुख सदानंद दाते यांनी सांगितले की, ड्रग्जबाबत कोणत्या प्रकारची कारवाई करताना हलगर्जीपणा केला जाणार नाही. 2023 मध्ये केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. शून्य सहनशीलता धोरण अवलंबण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कारवाई झालीच पाहिजे. कुणालाही सोडू नये, असे सांगण्यात आले. 2022 मध्ये ऑक्टोबर महिन्यापर्यंत 15 ते 30 प्रकरणे नोंदवली गेली. तर २०२३ मध्ये या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली. त्याच वर्षी 2023 मध्ये ऑक्टोबर महिन्यापर्यंत 2491 प्रकरणे नोंदवली गेली होती. तर या ड्रग्ज प्रकरणात 3277 जणांना अटक करण्यात आली होती. अंमली पदार्थांच्या सेवनाबद्दल बोलायचे झाले तर, ऑक्टोबर 2022 पर्यंत सेवनाची 9530 प्रकरणे आढळून आली आणि सुमारे 9700 लोकांना अटक करण्यात आली. ऑक्टोबर 2023 पर्यंत सेवनाच्या 10536 प्रकरणे आढळून आली आणि सुमारे 10231 लोकांना अटक करण्यात आली.

कोट्यवधीचे हेरॉईन जप्त: याशिवाय दहशतवाद विरोधी पथकाने 'एनडीपीएस' कायद्यांतर्गत कारवाई करताना ५ ऑगस्ट २०२२ ला ५१८ ग्रॅम हेरॉईन जप्त केले होते आणि या प्रकरणी ६ जणांना अटकही केली होती. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 362 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच 5 हजार 240 किलो गांजा जाळून नष्ट करण्यात आला आहे. 2 हजार 728 किलो मेफेड्रान जप्त करण्यात आले. ज्याची किंमत 1400 कोटी रुपये आहे. अंमली पदार्थ विरोधी सेलने गेल्या पंधरवड्यात मोठी कारवाई केली होती. ज्यामध्ये अंमली पदार्थ बनवणारे काही कारखानेही उद्ध्वस्त करण्यात आले होते. 27 लाख लोकांपर्यंत पोहोचून आम्ही आमची ड्रग्जविरोधी मोहीम सुरू केली आहे. राज्य सरकारची योजना चार पातळ्यांवर आहे. ही मोहीम चालवण्यासाठी कुणाच्या पुढाकाराची गरज नाही तर सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे आवाहन दाते यांनी केले.


बंद पडलेल्या कंपन्यांवरही पोलिसांची करडी नजर: राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस महानिरीक्षक संजय सक्सेना यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत ड्रग्ज राज्यात वाढू देऊ नये. त्यामुळेच ही सर्व कारवाई करण्यात येत आहे. सर्व प्रादेशिक पोलीस ठाण्यांना याबाबत कारवाई करण्याची स्पष्ट माहिती देण्यात आली असून कुठेही अंमली पदार्थ पकडले गेल्यास अप-डाऊन पद्धतीने काम करण्यास सांगण्यात आले आहे. ज्या अनेक कंपन्या बंद अवस्थेत आहेत किंवा बंद पडल्या आहेत, त्यांच्या ठिकाणाबाबत आदेशही जारी करण्यात आले आहेत. ललित पाटील प्रकरणात सक्सेना यांनी सांगितले की, ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रश्नाबाबत चौकशी करण्यात आली. त्यात कोणत्या डॉक्टरची काय भूमिका आहे याचा तपास सुरू आहे. 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्यातून पळून गेलेल्या ललित पाटील प्रकरणी ३ पोलीस अधिकारी आणि ७ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

कुणीही असो, हयगय नाहीच: नाशिक, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात असलेल्या ड्रग्ज फॅक्ट्रींवर पोलिसांनी कारवाई केली असल्याने संबंधित या तिन्ही ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांची नियंत्रण कक्षात तडाकाफडकी बदली करण्यात आली आहे. ललित पाटील प्रकरणाबाबत सक्सेना यांनी चौकशी अद्याप सुरू असून 10 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. भविष्यात कोणतीही चौकशी होईल, त्यात कोणाचाही सहभाग असो, मग ते पोलीस असोत वा इतर कुणीही कारवाई होणारच असे पोलीस महानिरीक्षक संजय सक्सेना यांनी सांगितले. राजकीय क्षेत्राशी निगडीत कोणाचेही नाव अद्याप बाहेर आलेले नाही. पुढील तपास सुरू आहे.

ऑक्टोबर महिन्यातही मोठी कारवाई: साकीनाका पोलिसांनी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिक येथील शिंदे गाव येथे छापा टाकून 151 किलो ग्राम वजनाचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. त्याची अंदाजे किंमत 300 कोटी इतकी आहे. ललित पाटील प्रकरणाशी निगडित हा ड्रग्ज कारखाना साकीनाका पोलिसांनी उध्वस्त केला होता. याप्रकरणी ललित पाटील सह बारा आरोपींना अटक करण्यात आली होती. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्षाने 14 ऑक्टोबरला अटक करून पाच किलो एमडी ड्रग्स जप्त केले होते. पुढील तपासात आरोपी याच्याकडे अधिक चौकशी केली असता चिंचोली एमआयडीसी सोलापूर येथील केमिकल फॅक्ट्रीमध्ये आम्ही पदार्थ तयार केलेल्या असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने केमिकल फॅक्ट्रीवरील छापामार कारवाईत एकूण तीन किलो सहा ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ सापडून आले आहे. या गुन्ह्यात एकूण दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण आठ किलो 95 ग्रॅम वजनाचे ड्रग्स ज्याची किंमत 16 कोटी आहे ते जप्त करण्यात आले आहे. अंदाजे शंभर कोटी रुपयांचा 50 ते 60 किलो कच्चामाल पोलिसांनी जप्त केला आहे.


अंमली पदार्थ विरोधी कारवाईचा स्तर वाढला: वर्ष जानेवारी ते डिसेंबर २०२० मध्ये १८२३ केसेस दाखल झाल्या असून २२७४ आरोपींना अटक करण्यात आली. जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ मध्ये २४९१ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. ३२७७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ मध्ये १५३० केसेसची नोंद झाली असून २०१३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जानेवारी ते डिसेंबर २०२२ मध्ये एकूण ११८२४ केसेस दाखल झाल्यापासून १०८५१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ मध्ये १०५३६ केसेस दाखल झाल्या असून १०२३१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आकडेवारीवरून २०२३ मध्ये कारवाईचा स्तर वाढला असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा:

  1. Raid On Drug Factory : सोलापूरच्या ड्रग्ज कारखान्यातून नाशिकला व्हायचा ड्रग्ज पुरवठा; लाखो रुपयांचा माल जप्त
  2. Drug Seized In Solapur : सोलापुरात ड्रग्जचं पुन्हा घबाड; नाशिक पोलिसांची मोठी कारवाई
  3. Drug Seller Arrest : हेरॉईन ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.