ETV Bharat / state

ACB arrested police inspector : गुन्ह्यातील कलमं कमी करण्यासाठी पोलिसाने मागितला आयफोन, एसीबीने केली अटक

author img

By

Published : Mar 25, 2023, 5:47 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

मुंबईत धारावीमध्ये कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिसाला अटक केली आहे. गुन्ह्याचे स्वरुप सौम्य व्हावे यासाठी पोलिसाने 1 लाख किंवा आयफोनची मागणी केली होती. मात्र तो अलगदपणे एसीबीच्या जाळ्यात अडकला.

मुंबई : धारावी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजय माने (53) यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई करून अटक केली. तक्रारदार याच्याकडून गुन्ह्यातील कलम कमी करण्यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक विजय माने यांनी 28 वर्षीय तक्रारदार याच्याकडून आयफोन अथवा एक लाख रुपयांची लाच मागितली होती.

धारावी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजय माने यांनी 24 मार्चला तक्रारदाराविरोधात असलेल्या गुन्ह्यातील कलम कमी करण्यासाठी पोलीस निरीक्षक विजय माने याने तक्रारदाराकडून आयफोन किंवा एक लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर 24 मार्चलाच तक्रारदार व्यक्तीने 40 हजार रुपये पोलीस निरीक्षक माने याला दिले.

धारावी पोलीस ठाण्यात तक्रारदार आणि त्याच्या आईविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम 420 465 467 468 34 अन्वये पुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा 16 नोव्हेंबर 2022 ला दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तक्रारदार याला 16 नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. सध्या आरोपी असलेला तक्रारदार जामीनावर मुक्त आहे.

यातील तक्रारदार पोलीस निरीक्षक माने यांना भेटला असता माने याने तक्रारदार यास त्याच्यावर दाखल गुन्ह्यातील कलम कमी करण्याकरता एक लाख रुपये किंवा आयफोन मोबाइलची लाचेच्या स्वरूपात मागणी केली. त्यानुसार तक्रारदाराकडून आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता यातील प्रभारी पोलीस निरीक्षक माने यांनी स्वतःच्या वैयक्तिक लाभा करिता तुझ्यावरील गुन्ह्यातील कलम कमी करून देतो असे सांगून प्रथम एक लाख रुपये किंवा आयफोन मोबाईलची लाचेच्या स्वरूपात केली. तडजोडी अंती चाळीस हजार रुपये लाचेची मागणी केली. नंतर एसीबीने सापळा रचून कारवाईदरम्यान ती स्वीकारताना प्रभारी पोलीस निरीक्षक माने यांना रंगेहात पकडले. पोलीस अधिकारी माने यांच्याविरुद्ध कलम-7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 24 मार्चला करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान पोलीस निरीक्षक माने यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती चाळीस हजार इतक्या रकमेची लाच स्वरूपात मागणी करून ती रक्कम स्विकारण्याचे कबूल केले.

सर्व नागरीकांना एसीबीकडून आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

हेही वाचा - Rahul Gandhi Disqualification : माफी मागायला मी सावरकर नाही -राहुल गांधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.