ETV Bharat / state

कर्नाटक: धारवाड तुरुंगातील फरार आरोपी गजाआड

author img

By

Published : Sep 1, 2019, 10:03 PM IST

कर्नाटक: धारवाड जेल मधील फरार आरोपी गजाआड

मुंबईत पादचारी महिलांना त्यांच्या अंगावरील दागिने रुमालात ठेवा अशी खोटी बतावणी करून लुटणाऱ्या एका चोराला आणि त्याच्या साथीदाराला टिळकनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. हा आरोपी 20 फेब्रुवारी 2019 पासून कर्नाटक राज्यातील धारवाड जेलमधून फरार आहे. तो राज्य व राज्याबाहेर चोरी मारामारी व इतर गुन्ह्यात आरोपी आहे.

मुंबई - कर्नाटक राज्यातील धारवाड जेलमधून फरार असलेल्या आरोपीला टिळक नगर पोलिसांनी गजाआड केले आहे. यात निलेश जगन्नाथ डफाळे उर्फ दीपक पाटील (34) असे या आरोपीचे नाव आहे. निलेश डफाळे हा मुंबईतील अंधेरी जे बी नगरचा रहिवासी आहे. त्याच्यावर राज्य व राज्याबाहेर वेगवेगळ्या प्रकरणात 105 गुन्हे दाखल आहेत.

हे ही वाचा - पाच लाखांसाठी विवाहितेला जिवंत जाळले

मुंबईत पादचारी महिलांना त्यांच्या अंगावरील दागिने रुमालात ठेवा अशी खोटी बतावणी करून लुटणाऱ्या एका चोराला आणि त्याच्या साथीदाराला टिळकनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. हा आरोपी 20 फेब्रुवारी 2019 पासून कर्नाटक राज्यातील धारवाड जेलमधून फरार आहे. तो राज्य व राज्याबाहेर चोरी मारामारी व इतर गुन्ह्यात आरोपी आहे. आरोपीने मुंबईत 28 जुलैला टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावरून घरी जाणाऱ्या अनुसया वासा (69) आणि उल्हासिबाई जैन (58) या वयोवृद्ध महिलांना पुढे गुन्हा घडला आहे. पुढे जाऊ नका व अंगावरील दागिने रुमालात काढून ठेवा नाहीतर पोलीस दंड लावतील. अशी भीती दाखवून दागिने काढण्यास भाग पाडून रुमालात ठेवा म्हणून त्याना बोलण्यात गुंतवत त्यांच्याकडील सोने घेऊन पळून गेले होते.

हे ही वाचा - औरंगाबादच्या अल्पवयीन मुलीवर पुण्यात बलात्कार; अ‌ॅट्रोसिटीसह, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

याप्रकरणी दोन्ही महिलांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी एक तपास पथक तयार करून तपासाला सुरुवात केली. त्यानुसार खबऱ्याच्या मार्फत निलेश उर्फ दीपक हा नालासोपारा येथे लपला असल्याची खात्रीलायक माहिती टिळकनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी निलेश ला नालासोपारा येथून अटक केली. तर चोरीचे सोने विक्री करणारा निलेशचा साथीदार मोहम्मद सोहेल खान (29, रा. मिरारोड) याला टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अटक केली. त्याच्या ताब्यात असलेली ऍक्टिवा स्कूटर व दोन महिलांच्या अंगावरील दागिने असा 1 लाख 35 हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

हे ही वाचा - बॉलीवूडमध्ये काम करु इच्छिणाऱ्या मॉडेलने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारुन केली आत्महत्या

निलेश डफाळे वर राज्य व राज्याबाहेर 105 गुन्हे दाखल

निलेश हा सराईत चोर असून त्याच्या विरोधात मुंबई शहरातील व उपनगरातील मुलुंड, गोवंडी, टिळक नगर पोलीस ठाण्यात विविध प्रकरणाचे गुन्हे दाखल आहेत. तर, नवी मुंबईतील पनवेल, ठाणे याठिकाणी तसेच परराज्यात कर्नाटक, हैदराबाद मधील विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

Intro:धारवाड जेल मधून फरार असलेला शेकडो गुन्हे करणारा आरोपी गजाआड

मुंबईत पादचारी महिलांना त्यांच्या अंगावरील दागिने रुमालात ठेवा अशी खोटी बतावणी करून लुटणाऱ्या एका चोरास व त्याच्या सहकार्यास टिळकनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे यात निलेश जगन्नाथ डफाळे उर्फ दीपक पाटील वय 34 वर्षे याच्यावर राज्य व राज्याबाहेर वेगवेगळ्या प्रकरणात 105 गुन्हे दाखल आहेत.
Body: धारवाड जेल मधून फरार असलेला शेकडो गुन्हे करणारा आरोपी गजाआड

मुंबईत पादचारी महिलांना त्यांच्या अंगावरील दागिने रुमालात ठेवा अशी खोटी बतावणी करून लुटणाऱ्या एका चोरास व त्याच्या सहकार्यास टिळकनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे यात निलेश जगन्नाथ डफाळे उर्फ दीपक पाटील वय 34 वर्षे याच्यावर राज्य व राज्याबाहेर वेगवेगळ्या प्रकरणात 105 गुन्हे दाखल आहेत.

निलेश जगन्नाथ डफाळे उर्फ दीपक पाटील हा मुंबईतील अंधेरी जे बी नगर चा रहिवासी आहे तो 20 फेब्रुवारी 2019 पासून कर्नाटक राज्यातील धारवाड जेलमधून फरार आहे. तो राज्य व राज्याबाहेर चोरी मारामारी व इतर गुन्ह्यात आरोपी आहे त्यांनी मुंबईत 28 जुलै रोजी टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्त्यावरून घरी जाणाऱ्या अनुसया वासा वय 69 व उल्हासिबाई जैन वय 58 या वयोवृद्ध महिलांना पुढे गुन्हा घडला आहे. पुढे जाऊ नका व अंगावरील दागिने रुमालात काढून ठेवा नाहीतर पोलीस दंड लावतील अशी भीती दाखवून दागिने काढण्यास भाग पाडून रुमालात ठेवा म्हणून त्याना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील सोने चोरून घेऊन गेले होते. याप्रकरणी दोन्ही महिलांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी एक तपास पथक तयार करून तपासाला सुरुवात केली त्यानुसार खबऱ्याच्या मार्फत निलेश उर्फ दीपक हा नालासोपारा येथे लपला असल्याची खात्रीलायक माहिती टिळकनगर पोलिसाना मिळाली पोलिसांनी निलेश ला नालासोपारा येथून अटक केली तर चोरीचे सोने विक्री करणारा निलेशचा सहकारी मोहम्मद सोहेल खान वय 29 वर्षे राहणार मिरारोड यास टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अटक केली व त्याच्या ताब्यात असलेली ॲक्टिवा स्कूटर व दोन महिलांच्या अंगावरील दागिने अशी 1 लाख 35 हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

निलेश डफाळे उर्फ दीपक पाटीलवर राज्य व राज्याबाहेर 105 गुन्हे दाखल

निलेश हा आंतरराज्यीय सराईत चोर असून त्याचे विरोधात मुंबई शहरातील व उपनगरातील मुलुंड गोवंडी टिळक नगर पोलीस ठाण्यात विविध प्रकरणाचे गुन्हे दाखल आहेत तर नवी मुंबईतील पनवेल ठाणे आदी ठिकाणी तर परराज्यात कर्नाटक हैदराबाद मधील विविध ठिकाणी निलेशवर गुन्हे दाखल आहेत.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.