ETV Bharat / state

औरंगाबादच्या अल्पवयीन मुलीवर पुण्यात बलात्कार; अ‌ॅट्रोसिटीसह, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

author img

By

Published : Sep 1, 2019, 6:25 PM IST

या प्रकरणी पीडितेच्या वडिलांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करून पीडितेचा शोध घेतला. पीडितेने दिलेल्या जबाबावरून व वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.

औरंगाबादच्या अल्पवयीन मुलीवर पुण्यात बलात्कार; अ‌ॅट्रोसिटीसह, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल


औरंगाबाद - वदोडबजार येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला पुण्यात नेऊन तिच्यावर 24 वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. शेख राजीक शेख रजाक (वय 24) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोक्सो आणि अ‌ॅट्रोसिटी कायद्यानुसार वदोडबजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - पंढरपुरात दारू पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

वदोडबजार परिसरात राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी 28 ऑगस्टपासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करून पीडितेचा शोध घेतला. पीडितेने दिलेल्या जबाबावरून व वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी तरुण पीडित मुलीला अहमदनगर येथे बोलावून तेथून तिला पुण्यात घेऊन गेला. पुण्यात गेल्यानंतर तेथे एका घरात आरोपी तरुणाने पीडित मुलीवर बळजबरीने बलात्कार केला. या प्रकरणी पोक्सो व अ‌ॅट्रोसिटी कायद्यानुसार वदोडबजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून पुढील तपास सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले करीत आहेत.

हेही वाचा - चेंबूर येथे बलात्कार झालेल्या जालन्याच्या 'त्या' पीडितेचा मृत्यू

Intro:अल्पवयीन मुलीला पुण्यात नेऊन
वदोडबजार येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला बोलावून तिच्यावर 24 वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.या प्रकरणी पोक्सो आणि अट्रोसिटी कायद्यानुसार वदोडबजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. शेख राजीक शेख रजाक वय-24 (रा.वदोडबजार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव


Body:वदोडबजार परिसरात राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी 28 ऑगस्ट रोजी मिसिंग असल्याची तक्रार पोलोसानी प्राप्त झाली होती.त्यानंतर या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले, या प्रकरणी पोडितेच्या वाडीलाला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला. पीडितेचा शोध घेण्यात आला. पीडितेने दिलेल्या जबाबावरून व वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केले. आरोपी तरुणाने पीडित युवतीला अहेमदनगर येथे बोलावले होते.तेथून तिला पुण्यात घेऊन गेल्यानंतर तेथे एका घरात आरोपीने तरुणाने युवतीवर बळजबरीने बलात्कार केला. या प्रकरणी पोक्सो व अट्रोसिटी कायदा नुसार वदोडबजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलसानी आरोपी तरुणाला अटक केली आहे.पुढील तपास साह्ययक निरीक्षक सत्यजित ताईतवाले करीत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.