ETV Bharat / state

Medals for Police : प्रजासत्ताक दिन महाराष्ट्रातील 51 पोलिसांचा सन्मान

author img

By

Published : Jan 25, 2022, 4:55 PM IST

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

दरवर्षी प्रजासत्ताक दिनी ( Republic Day ) पोलिसांना गौरविण्यात येते. या पोलीस पदकांची आज ( दि. 25 जानेवारी) घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 51 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 7 पोलिसांना शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेसाठी 40 पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहेत.

मुंबई - बुधवारी ( दि. 26 जानेवारी ) प्रजासत्ताक दिन ( Republic Day ) साजरा होणार आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी पोलिसांना गौरविण्यात येते. या पोलीस पदकांची आज ( दि. 25 जानेवारी) घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 51 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 7 पोलिसांना शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेसाठी 40 पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहेत.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय ( Central Home Ministry ) दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक ( Police Medal ) जाहीर करते. यावर्षी एकूण 939 पोलीस पदक जाहीर झाली असून 88 पोलिसांना राष्ट्रपती पदक ( President's Police Medal ), 189 पोलिसांना पोलीस शौर्य पदक ( Award of Police Medal for Gallantry ) आणि 662 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस पदक ( Distinguished Service and Police Medal ) आणि दोन राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 51 पदक मिळाली आहेत. देशातील ८८ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पदक जाहीर झाले असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

  • चौघांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक -
  1. विनय कोरगावकर, अतिरिक्त पोलीस महासंचालक, जुने कस्टम हाऊस, फोर्ट मुंबई
  2. प्रल्हाद खाडे, कमांडंट राज्य राखीव पोलीस दल, गट ६, धुळे
  3. चंद्रकांत गुंडगे, पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज, दौंड, पुणे
  4. अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा, पोलीस उपनिरीक्षक एस.पी, नांदेड
  • राज्यातील एकूण सात पोलिसांना 'पोलीस शौर्य पदक'
  1. गोपाळ उसेंडी, सहायक पोलीस उपनिरीक्षक
  2. महेंद्र कुलेटी, नाईक पोलीस हवालदार
  3. संजय बकमवार, पोलीस हवालदार
  4. भरत नागरे, पोलीस उपनिरीक्षक
  5. दिवाकर नारोटे, नाईक पोलीस हवालदार
  6. निलेश्वर पड, नाईक पोलीस हवालदार
  7. संतोष पोटवी, पोलीस हवालदार
  • राज्यातील एकूण ४० पोलिसांना 'पोलीस पदक'
  1. राजेश प्रधान, विशेष पोलीस महानिरीक्षक, किनारी सुरक्षा आणि विशेष सुरक्षा, दादर मुंबई
  2. चंद्रकांत जाधव, सहायक पोलीस आयुक्त, मीरा भाईंदर, वसई विरार आयुक्तालय
  3. सीताराम जाधव, पोलीस उपअधीक्षक (वायरलेस), एडीजीपी आणि संचालक कार्यालय (संपर्क आणि वाहतूक), पुणे
  4. भारत हुंबे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंध विभाग, परभणी
  5. गजानन भातलवंडे, निरीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर
  6. अजयकुमार लांडगे, पोलीस निरीक्षक, आयुक्ताल, नवी मुंबई
  7. जितेंद्र मिसाळ, पोलीस निरीक्षक, आयुक्तालय, मुंबई
  8. विद्याशंकर मिश्रा, पोलीस निरीक्षक, एस.पी.सी.आय.डी., नागपूर
  9. जगदीश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक, आयुक्तालय, नवी मुंबई
  10. सुरेंद्र मलाले, पोलीस निरीक्षक, औरंगाबाद शहर
  11. प्रमोद लोखंडे, सहायक कमांडंट, राज्य राखीव पोलीस दल, गट ४, नागपूर
  12. मिलिंद नागावकर, सहायक पोलीस निरीक्षक, मुख्य गुप्तचर अधिकारी, एसआयडी, मुंबई
  13. शशिकांत जगदाळे, पोलीस निरीक्षक. मुंबई शहर
  14. रघुनाथ निंबाळकर,सहायक पोलीस निरीक्षक, मुंबई शहर
  15. संजय कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक, सीपी नाशिक शहर
  16. राष्ट्रपाल सवाईतुल, पोलीस उपनिरीक्षक, नागपूर शहर
  17. प्रकाश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक, पुणे शहर
  18. नंदकिशोर सरफरे, पोलीस उपनिरीक्षक, मुंबई शहर
  19. राजेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक, एसपी, परभणी
  20. शिवाजी देसाई, पोलीस उपनिरीक्षक, मुंबई शहर
  21. राजाराम भोई, पोलीस उपनिरीक्षक, एसपी, जळगाव
  22. देवेंद्र बागी, पोलीस उपनिरीक्षक, मुंबई शहर
  23. संभाजी बनसोडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सातारा
  24. बबन शिंदे, चालक, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एच.एस.पी.एस.पी., कोल्हापूर
  25. पांडुरंग वांजळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पुणे शहर
  26. विजय भोग, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पुणे शहर
  27. पांडुरंग निघोट, सहायक पोलीस उपनिरीक्षक, आयुक्तालय, नवी मुंबई
  28. राजेंद्र चव्हाण सहायक पोलीस उपनिरीक्षक, मुंबई शहर
  29. अनिल भुरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एस.पी. भंडारा
  30. संजय तिजोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पीसीआर, अहमदनगर
  31. रविकांत बडकी, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसपी यवतमाळ
  32. अल्ताफ शेख, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पीसीआर, अहमदनगर
  33. सत्यनारायण नाईक, सहायक पोलीस निरीक्षक, मुंबई शहर
  34. बस्तर मडावी, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसपी गडचिरोली
  35. काशिनाथ उभे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एटीएस पुणे
  36. अमरसिंग भोसले, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसीबी, कोल्हापूर
  37. आनंदराव कुंभार, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसपी सांगली
  38. मधुकर पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक, मुंबई शहर
  39. सुरेश वानखेडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, नागपूर शहर
  40. लहू राऊत, सहायक पोलीस उपनिरीक्षक, मुंबई शहर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.