ETV Bharat / state

बैल पोळ्यावर दुष्काळाचे सावट; बळीराजाने फिरवली पाठ

author img

By

Published : Aug 30, 2019, 1:40 PM IST

मराठवाड्यातील दुष्काळजन्य परिस्थितीचा परिणाम बैल पोळा सणावरही झाला आहे

मराठवाड्यातील दुष्काळजन्य परिस्थितीचा परिणाम बैल पोळा सणावरही झाला आहे. पोळ्यानिमित्त विविध प्रकारच्या सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा भरल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी केवळ सणाची परंपरा कायम ठेवण्याच्या उद्देशाने हा सण साजरा करण्यावर भर दिला आहे.

लातूर - मराठवाड्यातील दुष्काळजन्य परिस्थितीचा परिणाम बैलपोळा सणावरही झाला आहे. पोळ्यानिमित्त विविध प्रकारच्या सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा भरल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी केवळ सणाची परंपरा कायम ठेवण्याच्या उद्देशाने हा सण साजरा करण्यावर भर दिला आहे. दुष्काळ आणि वाढती महागाई यामुळे पोळ्याच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत कमालीचा शुकशुकाट होता.

मराठवाड्यातील दुष्काळजन्य परिस्थितीचा परिणाम बैल पोळा सणावरही झाला आहे.

दरवर्षी मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा केला जातो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या सणावर दुष्काळाचे सावट आहे. दिवसेंदिवस घटते उत्पन्न आणि शेतीचा वाढता खर्च यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाने पाठ फिरवल्याने आत्तापर्यंत सरासरीच्या केवळ 38 टक्के पाऊस झाला आहे.

हेही वाचा लाडक्या सर्जा-राजासाठी शेतकरी सज्ज; बैलपोळ्यासाठी बाजारपेठ सजली

यामुळे शेती धोक्यात आली असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कायम आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच दिवसाकाठी 200 ते 300 रुपयांची पदरमोड करून जनावरे जगवावी लागत असल्याने शेतकरी सर्व बाजूने संकटात आहे. यामुळे जिल्ह्यात बैलपोळ्याचा उत्साह कमी झाला आहे.

हेही वाचा 'माझ्या सर्जा रं...माझ्या राजा रं...' बैलपोळ्यानिमित्त बघा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट

सणाच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठा सजल्या होत्या. मात्र, विक्रेते ग्राहकांच्या प्रतिक्षेत होते. सणाच्या दिवशी जनावरे धुण्यासाठीही पाणी नसल्याने शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे.

Intro:पोळा सणावर दुष्काळाचे सावट ; बाजरपेठा फुलल्या मात्र बळीराजाने फिरवली पाठ
लातूर : संबंध मराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती ओढवली आहे. याचा परिणाम आता सर्जा-राजाच्या पोळा या सणावरही झाला आहे. पोळ्यानिमित्त बाजारपेठत एक ना अनेक प्रकारचे बैल सजीवण्याचे साहित्य दाखल झाले आहे. मात्र, शेतकऱ्यांनी सणाची केवळ परंपरा कायम ठेवण्याच्या उद्देशाने हा सण साजरा करण्यावर भर दिला आहे. दुष्काळ आणि वाढती महागाई यामुळे पोळा सणाच्या पूर्वसंध्येला लातूरतील बाजारपेठेत कमालीचा शुकशुकाट होता.


Body:दरवर्षी मोठ्या बैलपोळा साजरा केला जातो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या सणावरला दुष्काळाचे सावट आहे. दिवसेंदिवस घटते उत्पन्न आणि शेती व्यवसायात वाढता खर्च यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यंदा तर हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने जिल्ह्यात पाठ फिरवलेली आहे. आतापर्यंत सरासरीच्या केवळ 38 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप धोक्यात असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कायम आहे. दिवसाकाठी 200 ते 300 रुपयांची पदरमोड करून जनावरे जगवावी लागत आहेत. शिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम असल्याने शेतकरी चोही बाजूने संकटात आहे. त्यामुळे सण साजरा केला जाणार असला तरी यामध्ये शेतकऱ्यांचा उत्साह मात्र, कमी प्रमाणात आहे. सणाच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठा सजल्या होत्या मात्र, विक्रेत्यांना प्रतीक्षा होती ती बळीराजाची. शिवाय चांगाळे, झुली, कासरा यासारख्या साहित्याची किमतीमध्ये दहा टक्क्याने वाढ झाली आहे. त्यामुळे दरवर्षीची परंपरा कायम ठेवण्याच्या उद्देशाने हा सण साजरा केला जात आहे... शेतकऱ्यांचा उत्साह मात्र कमी प्रमाणात आहे. पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे की, सनादिवशी जनावरे धुण्यासाठीही पाणी नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


Conclusion:दुष्काळ आणि महागाई या दुहेरी संकटाला त्रासून हा सण होत आहे. किमान परतीचा पाऊस पडेल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.