ETV Bharat / city

लाडक्या सर्जा-राजासाठी शेतकरी सज्ज; बैलपोळ्यासाठी बाजारपेठ सजली

author img

By

Published : Aug 30, 2019, 12:42 PM IST

बैलपोळा साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने आपल्या ढवळ्या-पवळ्याला सजविण्यासाठी झूल, रंगीबिरंगी गोंडे, घंट्यांच्या माळा आदी साहित्य खरेदीसाठी गुरुवारी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली होती.

नाशिकमध्ये पोळ्यासाठी बाजारपेठा सजल्या

नाशिक - शेतकरी बांधवांसोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या लाडक्या सर्जा-राजाचा बैलपोळा हा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधवांची बाजारपेठेत गर्दी होताना दिसत आहे. तसेच शहरात राहणाऱ्या नागरिकांकडून मातीची बैलजोडी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू आहे.

नाशिकमध्ये पोळ्यासाठी बाजारपेठा सजल्या

हेही वाचा... अहो ऐकलंत का..? उस्मानाबादेत पार पडले 'गंगा' गाईचे डोहाळे जेवण

यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने आपल्या ढवळ्या-पवळ्याला सजविण्यासाठी झूल, रंगीबिरंगी गोंडे, घंट्यांच्या माळा आदी साहित्य खरेदीसाठी गुरुवारी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली होती. गुरुवारी दिवसभर बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण दिसून आले. शेतकऱ्यांसोबत शेतीत राबणाऱ्या त्याच्या सुख-दु:खात सोबत राहणाऱ्या ढवळ्या पवळ्याचा सण म्हणजे बैलपोळा. शेतात काबाडकष्ट करणाऱ्या आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण शेतकरी थाटात साजरा करत असतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी करीत सजावट साहित्य खरेदी केले.

हेही वाचा... नंदुरबार : पोळ्यानिमित्त बाजारपेठा सजल्या, सरजा-राजाला सजवण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

शेतामध्ये पूर्वी जी कामे करण्यासाठी बैलांचा उपयोग होत होता, त्यापैकी आता बहुतांश कामे ट्रॅक्टर किंवा आधुनिक यंत्राचा वापर करून केली जातात. त्यामुळे बैलांचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. बैलांची संख्या कमी झाल्यामुळे अनेक अडचणी भासतात. परंतु आजही ग्रामीण भागात परंपरा म्हणून पोळा सण उत्साहात साजरा करण्यात येतो. नाशिक शहरातील रविवार कारंजा येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात छोट्या मोठ्या विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यात नारळ, मातीचे आकर्षक बैल, पूजेसाठीचे बैल, मातीचा घोडा, पूजेचे साहित्य अशावस्तूंचा समावेश असुन मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पाच ते दहा टक्के भाव वाढ झाल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा... बैलपोळा दुष्काळात; शेतकऱ्यांच्या 'राजा'ला घागरभर पाण्यातच अंघोळ

Intro:शेतकरी बांधवांना आपल्या शेतात मदत करणाऱ्या लाडक्या सर्जा-राजाचा पोळा हा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून
बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे तसेच शहरात राहणाऱ्या नागरिकांकडून मातीची बैलजोडी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू आहे.Body:पोळा साजरा करण्यासाठी शेतकरी बळीराजाची लगबग सुरू आहे यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने आपल्या ढवळ्या-पवळ्याला सजविण्यासाठी झूल रंगीबिरंगी गोंडे घंट्यांच्या माळा आदी साहित्य खरेदीसाठी गुरुवारी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली होती. गुरुवारी दिवसभर बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण दिसून आले. शेतकऱ्यांसोबत शेतीत राबणाऱ्या त्याच्या सुख-दु:खात सोबत राहणाऱ्या ढवळ्यापवळ्याचा सण म्हणजे पोळा. शेतीत पिक उगविण्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण शेतकरी थाटात साजरा करीत असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी करीत सजावट साहित्य खरेदी केलीConclusion:शेतामध्ये पूर्वी जी कामे करण्यासाठी बैलांचा उपयोग होत होता त्यापैकी आता बहुतांश कामे ट्रॅक्टर किंवाआधुनिक यंत्राचा वापर करून केली जातात. त्यामुळे बैलांचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत असल्याचे प्रकर्षाने दिसते. बैलांची संख्या कमी झाल्यामुळे अडचणी भासतात. परंतु आजही ग्रामीण भागात परंपरा म्हणून पोळा सण उत्साहात साजरा करण्यात येतो.शहरातील रविवार कारंजा येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यात नारळ, मातीचे आकर्षक बैल,पूजेसाठीचे बैल, मातीचा घोडा, पूजेचे साहित्य अशावस्तूंचा समावेश असुन मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पाच ते दहा टक्के भाव वाढ झाल्याच व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आलंय..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.