ETV Bharat / state

Amit Shah Visit To Kolhapur : अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीकरता कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन

author img

By

Published : Feb 19, 2023, 6:57 AM IST

Amit Shah Visit To Kolhapur
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री आणि कोल्हापूरचे जावई अमित शाह हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. शिवाय लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हातकणंगले आणि कोल्हापूर मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा देखील घेणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस देखील कोल्हापुरात आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.

कोल्हापूर : अमित शाहांच्या दौऱ्यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोल्हापूर शहराला पोलिसांच्या छावणीचे रुप आले आहे.अमित शाह यांच्या दौऱ्यासाठी दिल्लीहून पोलिसांचे विशेष पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे. तर कालपासूनच अमित शाह ज्या ठिकाणांवर भेट देणार आहेतl त्या ठिकाणी कोल्हापूर पोलीस आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून पाहणी करण्यात आली. वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आला आहे.

अमित शाह यांचा असा असणार दौरा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उद्या दुपारी 1.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे येणार आहेत. दुपारी 1.45 ते 2.15 पर्यंत ते श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी जाणार आहेत. दुपारी 2.30 ते 2.35 वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तेथून ते दुपारी 2.40 वाजता हॉटेल पंचशील येथे येणार आहेत. दुपारी 3.15 ते 4.30 पर्यंत अमित शाह यांच्या पत्नी शिकलेल्या एज्युकेशन ट्रस्टच्या एस एम लोहिया हायस्कूलच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तेथून ते सायंकाळी 5 वाजता नगाळा पार्क येथील भाजपच्या नूतन कार्यालयाची पाहणी करणारा आहेत. रात्री 8 वाजता हॉटेल पॅव्हेलियन येथे बैठक ही घेणार आहेत. तेथून रात्री 9.30 वाजता ते विमानाने दिल्लीकडे जाणार आहेत.



कोल्हापूर शहराला छावणीचे स्वरूप : दोन दिवसांपासून दिवसभर कोल्हापूर पोलीस व केंद्रीय पोलीस दलाकडून संयुक्तपणे दसरा चौकात छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुतळा, शिवाजी चौकातील शिवाजी महाराज पुतळा, न्यू एज्युकेशन सोसायटीचा पेटाळ्यावरील कार्यक्रम, विमानतळ आदी ठिकाणांवर पाहणी करण्यात आली. असून बंदोबस्ताठी दुसऱ्या जिल्ह्यातून ही मोठा फौजफाटा मागवण्यात आला आहे. सुमारे 500 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी कोल्हापुरात दाखल झालेत. आज शिवजयंती असल्याने कोल्हापूर शहरातील प्रमुख एकेरी मार्ग दुहेरी वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, कणेरी मठ शोभायात्रा, जोतिबा खेटे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे आज प्रमुख ठिकाणी एकेरी मार्ग दुहेरी करण्यात येत आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील उद्या शहरात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याने कोल्हापूर विमानतळ परिसर आणि संपूर्ण शहरात ड्रोन कॅमेरा चित्रीकरणास बंदी घालण्यात आली आहे. विनाकारण बाहेर पडू नका. अत्यंत गरजेचे असले तर आपले आधार कार्डजवळ बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


मंत्रिमंडळ विस्तारावर ही चर्चा होणार?: शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह दिल्याने अमित शाह यांच्या या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. चिन्ह आणि पक्षाच्या नावाचा निर्णय झाल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याने मंत्रिमंडळ विस्तारासाठी सरकारकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विस्तार करण्याकडे शिंदे फडणवीस सरकारचा विचार असल्याची चर्चा आहे.



लोकसभेच्या अनुषंगाने मेळावा : अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर येत असून यापूर्वी देखील दोन केंद्रीय मंत्री कोल्हापूर दौऱ्यावर येऊन गेले आहेत. यामध्ये नितीन गडकरी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचा समावेश आहे. भाजपच्यावतीने लोकसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असलेली हातकणंगले मतदारसंघ आणि कोल्हापूर मतदार संघ काबीज करण्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही मतदारसंघात भाजपची पकड कशा पद्धतीने घट्ट करता येईल, आपण केलेले काम लोकांपर्यंत कसे पोहोचवता येईलस, याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाह देखील या दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत मार्गदर्शन करणार आहेत. आगामी निवडणुकांमध्ये ताकदीने उतरून भाजपला कशा पद्धतीने चांगले यश मिळेल. याचा प्रयत्न आमचा असणार आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाची शिदोरी आम्हाला मोलाची ठरेल असेदेखील कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Shiv Jayanti 2023 : प्रत्येक किल्ल्यांवर का असतात शिव मंदिर? पाहा काय आहे इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.