ETV Bharat / state

Gram Panchayat Elections : राधानगरीत संभाजीराजेंच्या 'स्वराज्य संघटनेचा' पहिला झेंडा

author img

By

Published : Dec 21, 2022, 11:49 AM IST

Gram Panchayat Elections
राधानगरीत संभाजीराजेंच्या 'स्वराज्य संघटनेचा' पहिला झेंडा

कोल्हापुरातील राधानगरी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत संभाजी राजे स्वराज्य संघटनेचा विजय झाला. स्वराज्य संघटनेच्या (swarajya sanghatana ) माध्यमातून ज्यांना निवडणूक लढवायची आहे, त्यांनी नाव नोंदवून लढवू शकता असे आवाहन कोल्हापूरच्या राधानगरी या ग्रामपंचायत निवडणुकीत ( Gram Panchayat Elections ) संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी केले होते. ( Swarajya Sangathan won grampanchayat election )

कोल्हापूर : या ग्रामपंचायत निवडणुकीत ( Gram Panchayat Elections ) संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी आपल्या स्वराज्य संघटनेच्या (swarajya sanghatana ) माध्यमातून ज्यांना निवडणूक लढवायची आहे, त्यांनी नाव नोंदवून लढवू शकता असे आवाहन केले होते. त्यानंतर राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळाला होता आणि विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात उमेदवार सुद्धा विजयी झाले आहेत. तर राज्यात 13 सरपंच स्वराज्य संघटनेचे निवडून आले (elected from Swarajya Sangathan ) आहेत. विशेष म्हणजे स्वराज्य संघटनेचा पहिला भगवा फडकला ( first saffron of Swarajya organization raised ) तो म्हणजे कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यामधून, येथील बनाचीवाडी गावा ने मान गादीला, मत स्वराज्य संघटनेला म्हणत स्वराज्य संघटनेच्या सरपंच पदाच्या उमेदवार प्राजक्ता जयवंत पताडे यांना बहुमताने निवडून दिले. शिवाय सरपंच आणि ९ पैकी ७ जागांवर विजय मिळवत बनाचीवाडी गावावर स्वराज्याचा भगवा फडकवला आहे.


त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे राहू : संभाजीराजे या विजयानंतर संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया सोशल मिडियाद्वारे व्यक्त केली आहे.स्वराज्य संघटना आजही सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. काही लोक स्वयंपुर्तीने स्वराज्य संघटनेच्या नावाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाग घेत आहेत, आणि लोकांचा त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वराज्य संघटने राजकारणात यावे अशीच इच्छा लोकांची असल्याचे दिसून येते. यातून अधिक जोमाने काम करण्याची उर्जा आम्हा सर्वांना मिळत आहे. जे लोक आमच्या सोबत आहेत, आणि येतील त्यांच्या पाठीशी भक्कम पणे आम्ही उभे राहू असेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हंटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.