ETV Bharat / state

Notice to Gokul Chairman : 'या' कारणामुळं गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांना नोटीस; विभागीय उपनिबंधकांनी मागवलाय खुलासा

author img

By

Published : Aug 22, 2023, 12:15 PM IST

Updated : Aug 22, 2023, 12:29 PM IST

Notice to Gokul Chairman
गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे

कोल्हापूरमधील दूध संस्थांमध्ये असलेल्या जुन्या पद्धतीच्या वजन काट्यांमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळं राज्य शासनाच्या वैधमापनशास्त्र नियंत्रकांनी प्राथमिक दूध संस्थांमध्ये 'दहा मिलीग्रॅम अचूकतेचे वजन काटे बसवा' असा आदेश दिला होता. परंतु याची अंमलबजावणी न केल्यामुळं गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांना विभागीय उपनिबंधकांनी नोटीस पाठविली आहे.

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गावांमध्ये असणाऱ्या प्राथमिक दूध संस्थांमध्ये जुन्या पद्धतीचे वजन काटे आहेत. त्यामुळं दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकाराबाबत थेट दूध संस्थांमध्ये जाऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोरच वजन काट्यांबाबत संभाजी ब्रिगेडने जाब विचारला होता. तसेच दूध संस्ठांमध्ये दहा मिलीग्राम अचूकतेचे वजन काटे बसवावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली होती.

शासन निर्णयाला हरताळ : या मागणीची दखल घेत राज्य शासनाच्या वैधमापनशास्त्र नियंत्रकांनी सर्व दूध संस्थांमध्ये 1 जानेवारी 2023 पासून दहा मिलीग्राम अचूकतेचे वजन काटे बसवावेत, असा आदेश दिला होता. परंतु कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळच्या अध्यक्षांनीच 'या' शासन निर्णयाला हरताळ फासल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला. याबाबतची तक्रार विभागीय उपनिबंधक महेश कदम यांच्याकडे दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची गंभीर दाखल घेत चेअरमन अरुण डोंगळे यांना खुलासा करण्याचे आदेश नोटीसद्वारे देण्यात आले.

वजन काटे बसवण्यावरून वाद : गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्याकडून दूध संस्थांना 'असे' काटे न बसवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. याबाबतची तक्रार 10 ऑगस्ट 2023 रोजी संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक रुपेश पाटील यांनी विभागीय उपनिबंधकांकडे केली. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी का केली नाही, याबाबतचा खुलासा करावा, अशी नोटीस 21 ऑगस्ट रोजी बजावण्यात आलीय.

डोंगळे यांचे स्पष्टीकरण - दुसरीकडे चेअरमन अरुण डोंगळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना, आपण शासन निर्णयाशी बांधील असल्याचे सांगितले. मात्र जिल्ह्यातील दूध संस्थाचालक आणि सचिवांच्या काही समस्या आहेत. या समस्या जाणून घेऊन राज्यशासनाने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच आपण सरकारने घेतलेल्या निर्णयाशी बांधील असल्याचं स्पष्ट केले.


जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम : जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळमध्ये दोनच वर्षांपूर्वी सत्तांतर झालंय. सत्तांतरानंतर विश्वास पाटील यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळलीय आणि अरुण डोंगळे चेअरमन पदावर विराजमान झालेत. या कार्यकाळात गोकुळला लेखापरीक्षणाला सामोरे जावं लागलं. आता थेट चेअरमन अरुण डोंगळे यांचं संचालकपदच रद्द करावं, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आलीय.

राजकीय वातावरण तापणार : शासन निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याचा ठपका डोंगळे यांच्यावर ठेवण्यात आलाय. सध्या गोकुळमध्ये काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची सत्ता आहे, तर गोकुळच्या कारभारावरून विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी रान उठवलं आहे. यामुळं गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांना आलेल्या नोटीसमुळं जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. गोकुळच्या चेअरमनपदी अरुण डोंगळे यांची दुसऱ्यांदा निवड, 10 वर्षानंतर पुन्हा झाले संचालक
  2. Kolhapur Milk Producers Association: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळमध्ये अध्यक्ष बदलाच्या हालचाली; लेखापरीक्षणाचे उमटले पडसाद
  3. Gokul Meeting Rada : कोल्हापुरात गोकुळच्या सभेआधी राडा, विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी
Last Updated :Aug 22, 2023, 12:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.