ETV Bharat / state

Masks compulsory : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती

author img

By

Published : Dec 22, 2022, 5:10 PM IST

Updated : Dec 22, 2022, 7:11 PM IST

कोल्हापुरातील अंबाबाई
कोल्हापुरातील अंबाबाई

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात (Ambabai temple Kolhapur) कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती (Masks compulsory for employees) करण्यात आली आहे. मास्कशिवाय कर्मचाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, अशा सक्त सूचना करण्यात आली आहे.

कोल्हापूर : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. मास्कशिवाय कर्मचाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, अशा सक्त सूचना करण्यात आली आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आला आहे. तसेच चीन, अमरिकेसह युरोपातील काही देशांमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याचे दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमिवर हे निर्बंध घालण्यात आले आहेत.

दररोज हजारो भाविक अंबाबाईच्या दर्शनाला : कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून चीन मध्ये सुद्धा पूर्वीप्रमाणे कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सगळ्या जगाचीच चिंता वाढली आहे. त्यामुळे भारतात सुद्धा आता काळजी घेण्याचे आवाहन केले असून विमानतळावर सुद्धा विशेष काळजी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात नियम कडक करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली असून येणाऱ्या काळात कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन भाविकांना सुद्धा मास्क सक्तीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

बचावात्मक उपाय योजना करायला सुरवात करावी : चीननंतर आता जगात कोरोनाचा (Omicron variant) प्रादुर्भाव वाढतो (Corona increasing) आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवे दिशानिर्देश जारी केले (Central government issued new guidelines) आहे. राज्य सरकारने सुद्धा बचावात्मक उपाय योजना करायला सुरवात करावी अशी मागणी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. आज कोरोनाच्या विषयावर Coronavirus news मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या उपस्थितीत कोविड नियंत्रण आढावा बैठक (Covid Control Review Meeting) होणार आहे.

ग्रामीण भागात ऑक्सिजन प्लांट : चीन, ब्राझील आणि इतर देशांमध्ये कोविड-19 चा उद्रेक लक्षात घेता आपण सतर्क राहण्याची गरज आहे. आम्ही केंद्र सरकार आणि (WHO) च्या सल्ल्याचे काटेकोरपणे पालन करणे आणि ट्रॅकिंग, चाचणी, उपचार आणि कोविड-योग्य वर्तन (Coronavirus today Maharashtra) यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांनी म्हटले आहे. आम्ही ग्रामीण भागात ऑक्सिजन प्लांट बनवले. पण ते आता चांगल्या स्थितीत आहेत की नाही हे तपासण्याची गरज आहे. औषधांचाही तुटवडा आहे असे मला वाटते. कोरोनाची नवीन रूपे जाणून घेण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग महत्वाचे आहे. व्हेंटिलेटर आणि कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये यासाठीही व्यवस्था केली पाहिजे असेही टोपे यांनी म्हटले आहे. (Corona cases in Maharashtra)

Last Updated :Dec 22, 2022, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.