ETV Bharat / state

Kolhapur Suicide Case : जय-विरूच्या जोडीने एकाच वेळी घेतला जगाचा निरोप; कोल्हापुरात दोन जिवलगांची आत्महत्या

author img

By

Published : Apr 3, 2023, 9:33 PM IST

एकाच वेळी गळफास लावून दोघा मित्रांनी आपले जीवन संपवल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील पारगाव गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील वडगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. या घटनेने कोल्हापूर हादरले आहे. दोघेही एकमेकांचे अत्यंत जिवलग मित्र होते. त्यांना परिसरात जय-विरूची जोडी बोलत. दोघांनी एकाच झाडाला आणि एकाच फांदीला गळफास लावून जीवन संपवले.

Kolhapur Suicide Case
जय-विरूच्या जोडीने एकाच वेळी घेतला जगाचा निरोप

कोल्हापूर : दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार विनायक पाटील आणि बाबासाहेब मोरे दोघेही नेहमीच एकत्र पाहायला मिळायचे. दुचाकी गाडीवर अनेकदा गावकऱ्यांना दिसायचे. यातील विनायक याचा चिरा-दगड पुरविण्याचा व्यवसाय होता, तर बाबासाहेब मोरे याचा जनावरांचा गोठा होता. अनेकदा ते एकत्रच पाहायला मिळायचे. त्यांच्या भागातील लोक त्यांना जय-विरूची जोडी बोलायचे. मात्र, दोघांनी जगाचा निरोप घ्यायचा निर्णय घेत एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आज सोमवारी दुपारी येथील तात्यासाहेब कोरे मिलीटरी हायस्कूल परिसरात एका झाडाला गळफास लावल्याचे उघड झाले.

दोघांच्याही डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर : दोघांच्याही डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने त्यांनी हा आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या घटनेची वडगाव पोलिसांत नोंद झाली आहे. विनायक पाटील यांच्या पाश्चात आई, मुलगा, पत्नी आणि केवळ 10 दिवसांची मुलगी आहे, तर आणि बाबासाहेब मोरे यांच्या पश्चात्य आई, वडील, पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. विनायक शिवाजी पाटील (वय 40) आणि बाबासाहेब हिंदुराव मोरे (वय 41) असे या दोघां जिवलग मित्रांचे नाव आहे.

कोल्हापूर हादरले : कोल्हापुरातील हातकंणगले तालुक्यातील पारगाव येथील घटनेने कोल्हापूर शहर हादरले आहे. प्रगत जिल्हा म्हणून ओळखले जाणारे कोल्हापूर आता आत्महत्येचे केंद्र बनत चालले आहे. कोल्हापुरात आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही. कर्जाच्या कारणाने या दोघांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. दोघांचाही चांगला व्यवसाय चालू असताना, त्यांनी घेतलेल्या कर्जाची घरच्यांना अधिक माहिती नव्हती. परंतु, परिसरात याची चर्चा असायची. दोघेही खास मित्र म्हणून परिसरात ओळखले जायचे.

कोल्हापुरात गुन्ह्यांची मालिका सुरूच : राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असल्याने नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. असाच एक प्रकार कोल्हापुरात देखील उघडकीस आला आहे. संतोष रंगराव पाटील वय वर्ष 35 राहणार पांगिरे तालुका भुदरगड याला अटक केली आहे. बेरोजगार तरुणांना महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून एक लाख 75 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला लक्ष्मीपूरी पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या आहेत. संतोष रंगराव पाटील वय वर्ष 35 राहणार पांगिरे तालुका भुदरगड असे त्याचे नाव आहे. हा प्रकार जानेवारी 2021 ते जुलै 2021 या काळात घडला दरम्यान पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता देखील पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

बनावट स्वाक्षरीचा वापर करून फसवणूक : तरुणांना नोकरी देण्याचे आमिष दाखवत महापालिकेच्या लेटरपॅडवर आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून तरुणांना गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. घटना उघडकीस आल्यानंतर महानगरपालिकेत एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या घटनेची दखल घेतली. तपासाधिकार्‍यांना सखोल चौकशीचे आदेश दिले आणि तपासाअंती संशयित आरोपी संतोष रंगराव पाटील राहणार पांगिरे तालुका भुदरगड याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : Speed Boat Accident : संभाजीराजे आणि मंत्री उदय सामंत थोडक्यात बचावले, मांडवा जेट्टीवर आदळली स्पीडबोट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.