ETV Bharat / state

मराठा आरक्षणप्रश्नी छत्रपती संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट, राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रतिनिधी असणार उपस्थित

author img

By

Published : Sep 1, 2021, 6:13 PM IST

छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले
छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले

मराठा समाजाला आरक्षणाची गरज आणि समाजाच्या भावना राष्ट्रपतीपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले (उद्या 2 सप्टेंबर)रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठवण्याचे आवाहन केले आहे.

कोल्हापूर - मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडणार आहोत. यामध्ये मराठा समाजाला आरक्षणाची गरज आणि समाजाच्या भावना राष्ट्रपतीपर्यंत पोहोचवसाठी छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले (उद्या 2 सप्टेंबर)रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठवण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार सर्व प्रतिनिधींच्या उपस्थितीत संभाजीराजे राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता भेटीकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.

चारही पक्षातील प्रतिनिधींना आमंत्रण

मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींकडे मांडण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या सोबत राज्यातील प्रमुख चार पक्षांच्या प्रतिनिधींनाही सोबत येण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि काँग्रेसतर्फे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे आजारी असल्याने आमदार संग्राम थोपटे हे त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सहभागी असणार आहेत.

'मराठा आरक्षणाबाबतची जबाबदारी एकट्याची नसून सर्वच पक्षांची'

संभाजीराजे छत्रपती हे गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सक्रिय असून, मूक आंदोलनापासून रस्त्यावरील आंदोलन ते न्यायालयीन लढाईपर्यंत ते सर्व स्तरांवर प्रयत्न करत आले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी कोणत्याही एका पक्षाची नसून, सर्व पक्षांनी एकत्र येऊन यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे संभाजीराजेंनी अनेकवेळा बोलून दाखवले आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षीय हेव्यादाव्यांच्या पलीकडे जाऊन संभाजीराजे मोट बांधत आहेत. त्यामुळे आता उद्याच्या राष्ट्रपतींच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - संभाजीराजे मराठा आरक्षणावरून पुन्हा आक्रमक, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लिहले पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.