ETV Bharat / state

Clash On Vehicle Parking: दुचाकी लावण्यावरून दोन गटात वाद; सशस्त्र हल्ला अन् हाणामारी

author img

By

Published : Jun 22, 2023, 4:31 PM IST

दुचाकी वाहन पार्किंग करण्यावरून दोन गटात वाद झाला आणि याचे रूपांतर तुंबळ हाणामारीमध्ये झाले. दोन्ही गटातील लोकांनी चाकूसह एकमेकांवर हल्ला केला. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. ही सर्व घटना काल (बुधवारी) रात्री कोल्हापुरातील व्हिनस कॉर्नर परिसरात घडली.

Clash On Vehicle Parking
सशस्त्र हल्ला अन् हाणामारी

कोल्हापूर अशांतच; वाहन पार्किंगच्या वादातून वादावादी

कोल्हापूर : पाचही जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र येथेही दोन्ही गट समोरासमोर आल्याने पुन्हा गोंधळ झाला. यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.


'हे' होते वादाचे कारण: मिळालेल्या माहितीप्रमाणे, व्हिनस कॉर्नर परिसरात शिवाजी अप्पासाहेब मोरे, वैभव शिवाजी मोरे (रा. उत्तरेश्वर पेठ) यांचे हॉटेल आहे. तर त्याजवळच इक्बाल गुडन शेख आणि गुडन सय्यद शेख (रा. कदमवाडी) यांची अंडा आम्लेटची हातगाडी आहे. येथे हॉटेल समोर दुचाकी लावण्यावरून या दोघात वाद सुरू झाला आणि हा वाद चिघळला. याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही बाजूंनी चाकूसह हातात येईल ते हत्यार घेऊन एकमेकांवर हल्ला चढवला. सुमारे पंधरा मिनिटे ही हाणामारी सुरू होती. काहींनी अंडा आम्लेटच्या दोन्ही हातगाड्या उलथवून टाकल्या. दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन जमावाला पांगविले. या हल्ल्यात शिवाजी अप्पासाहेब मोरे, वैभव शिवाजी मोरे, आकाश वर्णे तर दुसऱ्या गटातील इक्बाल गुडन शेख व गुडन सय्यद शेख जखमी झाले असून त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयाच्या काचा फोडल्या: रुग्णालयात दोन्ही गटातील जखमी समोरासमोर आल्याने सीपीआरच्या अपघात विभागातही हाणामारी सुरू झाली. दोन्ही बाजूचे लोकांनी बाहेर गर्दी केली होती. त्या जमावाने रुग्णालयाच्या काचा फोडल्या. तर यामुळे अपघात विभागातील परिचारिका, डॉक्टर, वॉर्ड बॉयही घाबरले. एकाने विभागातील खाट उचलून जखमीच्या अंगावर फेकली. बाहेरचा जमाव आत शिरण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, पोलिसांनीही लाठीमार करत जमावाला पांगवले. या घटनेने व्हिनस कॉर्नर, सीपीआर परिसरात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते. दरम्यान वैभव मोरे आणि शिवाजी मोरे यांना तेथून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हाणामारीनंतर रिक्षा, दुचाकींचेही नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा:

  1. Manipur Violence 51 day : आसाम रायफल्स आणि अज्ञात उग्रवाद्यांमध्ये गोळीबार, मणिपूर हिंसाचाराने नागरिक हादरले
  2. Chatrapati Sambhajinagar Crime : सायबर सेलमुळे फसला उपसरपंच अन् दुकानदारचा ऑनलाईन दरोडा; हिरे व्यावसायिकाचे वाचले 110 कोटी
  3. Osmanabad Crime News: आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या निकटवर्तीय सुरेश कांबळे यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल, आत्महत्येपूर्वी तरूणाने केले गंभीर आरोप
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.