ETV Bharat / state

Chatrapati Sambhajinagar Crime : हिरे व्यावसायिकाचे थोडक्यात वाचले 110 कोटी, सायबर सेलमुळे दुकानदारावरचा ऑनलाईन दरोडा टळला

author img

By

Published : Jun 22, 2023, 2:27 PM IST

Updated : Jun 22, 2023, 7:47 PM IST

'स्टार रेज' या कंपनीच्या बँक ऑफ इंडियाच्या कार्पोरेट बँक खात्यात उपलब्ध असलेले तब्बल 110 कोटी रुपये इंटरनेट बँकिंगचा वापर करून बँकेच्या वेबसाईट हॅक करून रक्कम लंपास करण्याची प्रयत्न झाला. या प्रकरणात 6 जणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी रक्कम हस्तांतरित करून त्याचे क्रिप्टोकरेन्सीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करत होते.

सायबर सेलने ऑनलाईन दरोडेखोरांना अटक केली
सायबर सेलने ऑनलाईन दरोडेखोरांना अटक केली

सायबर सेलने ऑनलाईन दरोडेखोरांना अटक केली

छत्रपती संभाजीनगर : सायबर सेलच्या सतर्कतेमुळे मुंबईतील स्टार रेज कंपनीचे 110 कोटी रुपये वाचले आहेत. कंपनीचे बँकिग खाते हॅक करत बँक खात्यातील रक्कम लंपास करणाऱ्या 6 जणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबईतील स्टार रेज कंपनीच्या बँक खात्यात 110 कोटी रुपये असल्याची माहिती या आरोपींना मिळाली होती. त्यानंतर आरोपींनी कंपनीचे बँक खाते इंटरनेट बँकिंगचा वापर करून हॅक केले. हॅक केलेल्या बँक खात्यातून या पैशांचे रुपांतर क्रिप्टोकरेन्सी करत असल्याची माहिती सायबर सेल पोलिसांनी दिली.

हॉटेल देवप्रियामध्ये छापा : मुंबईतील स्टार रेज ही कंपनी हिऱ्यांचा व्यवसाय करते. या कंपनीचे खाते बँक ऑफ इंडिया या बँकेत असून त्यात 110 कोटी रुपये जमा असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. त्याआधारे आरोपींनी नेटबँकिंगचा वापर करून कंपनीचे बँक खाते हॅक केले. बँकेची वेबसाईट आणि कंपनीचे बँक खाते हॅक केल्यानंतर खात्यातील रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न आरोपी करत होते. दरम्यान याची गोपनीय माहिती सायबर सेल पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शहरातील हॉटेल देवप्रिया येथे छापा मारला. तिथे 6 जण इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत ऑनलाईन 110 कोटी रुपयांची लूट वाचवली. या धाडीत पोलिसांना तर अन्य काही कार्पोरेट कंपन्यांची कागदपत्रे आढळून आल्याची माहिती सायबर सेल पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली.

सहाजण अटकेत : सायबर सेल पोलिसांना या ऑनलाईन लूटची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी शेख इरफान शेख उस्मान, वसीम इसाक शेख, शेख कानिफ शेख आयुब, अब्बास शेख, अमोल साईनाथ करपे, कृष्णा बाळू करपे या आरोपींना अटक केली. सायबर पोलिसांनी या आरोपींकडून 6 मोबाईल, 2 लॅपटॉप आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. विशेष म्हणजे यातील आरोपी अमोल साईनाथ करपे हा कोडापुर झांजर्डी या गावातील उपसरपंच आहे. तर तिथेच कृष्णा बाळू करपे हा किराणा दुकान चालवतो, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

चोरीचा अभ्यास : ऑनलाइन दरोडा टाकण्यासाठी टोळी तयार करण्यात आली. त्यात कानिफ शेख या आरोपीने बँक ऑफ इंडियाच्या खात्यांचा वेगवेगळ्या बाजूनेद्वारे अभ्यास केला. बँक खात्यांची माहिती, त्याच्यातील डेटा, इंटरनेट बँकेची निगडित असलेली सविस्तर माहिती त्याने काढली होती. तर उपसरपंच कृष्णा बाळू करपे आणि अमोल करपे यांना पाच कोटी रुपयांचे आमिष दाखवून त्यांना या कटात सामील केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली.

हेही वाचा -

  1. Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाल गृहाच्या नावाखाली मुलांची विक्री करणाऱ्या संस्थेचा भांडाफोड; दामिनी पथकाची कारवाई
  2. Silver Palace Bar Raid : 'सिल्वर पॅलेस' बारवर पोलिसांचा छापा; १७ बारबालासह १५ जणांवर गुन्हा
Last Updated : Jun 22, 2023, 7:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.