ETV Bharat / state

कोल्हापूर: खासगी रुग्णालयांच्या बिलावर करडी नजर, २१ अधिकाऱ्यांची नियुक्ती

author img

By

Published : Aug 3, 2020, 7:37 PM IST

Appointment of 21 officers to monitor private hospital bills in kolhapur
कोल्हापूर: खासगी रुग्णालयांच्या बिलावर करडी नजर

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा वाढता आलेख सुरूच आहे. त्यामुळे अनेकजण उपचार लवकर मिळावेत, यासाठी खासगी रुग्णालयांना प्राधान्य देत आहेत. मात्र, खासगी रुग्णालये मोठ्या प्रमाणावर बिलं आकारत आहेत. अशा अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार रुग्णालयांच्या बिलावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी 21 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

कोल्हापूर - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा वाढता आलेख सुरूच आहे. त्यामुळे अनेकजण उपचार लवकर मिळावेत, यासाठी खासगी रुग्णालयांना प्राधान्य देत आहेत. मात्र, खासगी रुग्णालये मोठ्या प्रमाणावर बिलं आकारत आहेत. अशा अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार रुग्णालयांच्या बिलावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी 21 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेने यापूर्वी अशा रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम नियुक्त केली आहे. आता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रुग्णालयाध्येच बिल तपासणीसाठी लेखाधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. संबंधित रुग्णालयाने या अधिकाऱ्यांकडून बिलाची तपासणी झाल्यानंतर रुग्णांकडून बिलाची रक्कम स्विकारायची आहे. असे आढळून न आल्यास संबंधित रुग्णालयाला कारवाई करण्याचा इशाराही यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे.

नियुक्त केलेले अधिकारी खालील प्रमाणे

लेखाधिकारी आबा नागणे - साई कार्डियक सेंटर राजारामपुरी 6 गल्ली व गंगा प्रकाश हॉस्पिटल रंकाळा स्टँड.

लेखाधिकारी रूपाली रोकडे - मोरया हॉस्पिटल राजारामपुरी 9 गल्ली व सचिन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल राजारामपुरी 6 गल्ली.

लेखाधिकारी प्रिया देशमुख- ॲपल सरस्वती हॉस्पिटल कदमवाडी.

लेखाधिकारी संजय कुंभार - केळवकर हॉस्पिटल, ताराबाई पार्क ट्युलिप हॉस्पिटल, कदमवाडी

लेखाधिकारी वर्षा परीट - व्हिनस हॉस्पिटल, नागळा पार्क.

कृषी अधिकारी स्वप्निल हिरुगडे- डायमंड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, नागळा पार्क व केपीसी हॉस्पिटल, महाराणा प्रताप चौक.

उपसंचालक रंजीत झपाटी- अथायु हॉस्पिटल, उजळाईवाडी

लेखापरीक्षण पथक अजित शिंदे- सिद्धिविनायक नर्सिंग होम टाकाळा व व्यंकटेश हॉस्पिटल रविवार पेठ.

लेखाधिकारी अस्मिता मोठे- अंतरंग हॉस्पिटल नागाळा पार्क.

लेखाधिकारी अमृता कुंभार- सूर्या हॉस्पिटल, दसरा चौक.

लेखाधिकारी सुनील रेनके- मंगलमुर्ती हॉस्पिटल, शास्त्रीनगर.

लेखाधिकारी विभागीय संचालक कृषी विभाग जाधव - कृष्णा हॉस्पिटल, संभाजीनगर.

लेखाधिकारी सुनील चव्हाण - मेट्रो हॉस्पिटल,३ गल्ली शाहूपुरी व अथायु हॉस्पिटल,२ री गल्ली शाहूपुरी.

लेखाधिकारी सागर वाळवेकर- पल्स हॉस्पिटल व कोल्हापूर आर्थोपेडिक कदमवाडी.

लेखाधिकारी बाबा जाधव - सनराइज हॉस्पिटल व स्वस्तिक हॉस्पिटल शिवाजी पार्क.

लेखाधिकारी रवी पाटील- सिद्धिविनायक हार्ट हॉस्पिटल शास्त्रीनगर.

लेखाधिकारी मिलिंद पाटील- नॉर्थ स्टार स्पेशलिटी हॉस्पिटल व लाईफ लाईन हॉस्पिटल, भक्ती पूजानगर

लेखाधिकारी प्रशांत जाधव -कॅपिलोर हॉस्पिटल दुधाळी.

दुर्गाली थोरात - अपेक्स हॉस्पिटल, शिवाजी पार्क.

वरिष्ठ लेखा परीक्षक शोभा घाडगे- जानकी नर्सिंग होम, ३ री गल्ली राजारामपुरी, व सिटी हॉस्पिटल.

वरिष्ठ लेखा परीक्षक दीपक कुंभार- आधार हॉस्पिटल शास्त्रीनगर अशी यांची जबाबदारी असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.