ETV Bharat / state

Sharad Pawar PC : मुंबईच्या सूचनेवरून मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज - शरद पवारांचा घणाघात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 5:03 PM IST

Updated : Sep 2, 2023, 5:32 PM IST

Sharad Pawar PC
शरद पवार

Sharad Pawar PC : मुंबईच्या सूचनेवरून मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते जालन्यात बोलत होते.

जालना Sharad Pawar PC : राज्यात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी कशी करता येईल, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारला मोलाचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांनी जालन्यात जखमी मराठा आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेतली. अंतरवली सराटी गावात घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. हा प्रकार जालना जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता इतर ठिकाणीही पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

  • काल जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्यात जखमी झालेल्यांची उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्यासह जाऊन भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची… pic.twitter.com/PSQTNX1oh1

    — Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबईवरून पोलिसांना ऑर्डर : मुंबईवरून पोलिसांना ऑर्डर देण्यात आली. त्यामुळं पोलिसांनी बळाचा वापर केला असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. मी आंदोलकांशी संवाद साधला असता त्यांनी पोलिसांना मुंबईवरून फोन आल्याचं सांगितलं. आंदोलनातून काहीतरी मार्ग निघेल, अशी चर्चा सुरू होती. सर्व काही सुरळीत सुरू असताना, पोलिसांना सूचना मिळाल्यानं त्यांचा विचार बदलला. त्यानंतर त्यांनी थेट आंदोलकांवर लाठीमार केल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

जालन्यात सत्तेचा दुरुपयोग : जालन्यात सत्तेचा दुरुपयोग झाला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याकडं अधिक लक्ष द्यावं. आरक्षणासाठी संसदेत काही दुरुस्त्या करवाव्या लागतील. 50 टक्केपेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही असा नियम आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारला सहकार्य करणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. देशातील सुमारे 28 राजकीय पक्षांची बैठक मुंबईत झाली. त्यात 7 मुख्यमंत्री होते. या बैठकीत वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली. याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही, अशी माहिती यावेळी पवारांनी दिली.

जालन्यात आंदोलकांची भेट : जालना येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. याचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी जालन्यात आंदोलकांची भेट घेतली. मराठा आंदोलकांवर लाठीमार केल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी आंदोलकांना धीर दिला.

उदयनराजांची मराठा आंदोलकांशी चर्चा : खा. उदयनराजांनी जालन्यात आंदोलकांची भेट घेतली. यावेळी उदयनराजांनी अंतरवली सराटी गावात जाऊन आंदोलकांशी चर्चा करून त्यांना धीर दिला. यावेळी उदयनराजेंनी मराठा आंदोलकांशी चर्चा केली. घटना का घडली याचा खुलासा सरकारनं करावा, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. यावेळी व्यासपीठावर शरद पवारांबरोबर उदयनराजेंची उपस्थिती होती.

अंबड रुग्णालयात जखमींची विचारपूस : दुपारी अंबड रुग्णालयात पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलकांची शरद पवार यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अंतरवली सराटी गावात जाऊन उपोषणस्थळी भेट दिली. येथे मनोज जरंगे पाटील यांच्यासह जखमींची चौकशी करण्यात आली. अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी पोलिस, आंदोलकांमध्ये वादावादी झाली. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या त्यानंतर आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यावेळी आंदोलकांनी दगडफेकही केली. यावेळी पोलीस, आंदोलक मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. सरकार पोलिसांच्या मदतीनं आंदोलन चिरडत असल्याचा आरोप जरंगे पाटील यांनी केला. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. पोलिसांच्या लाठीचार्जचा सर्वत्र निषेध केला जात आहे. आज सकाळपासूनच आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी विविध पक्षांचे नेते, सामाजिक संघटना, मराठा बांधव उपोषणस्थळी पोहोचले आहेत.

हेही वाचा -

  1. Lathicharge in Jalna : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
  2. Nana Patole On Baton Charge Jalna : राहुल गांधीचं भाषण टीव्हीवर दिसू नये म्हणून गृहमंत्र्यांच्या आदेशानेच लाठीचार्ज - नाना पटोले यांचा आरोप
  3. Lathicharge on Maratha Protester : आधी मोठे मोर्चे निघाले, पण आताच....? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल
Last Updated :Sep 2, 2023, 5:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.