ETV Bharat / state

Lathicharge on Maratha Protester : आधी मोठे मोर्चे निघाले, पण आताच....? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 2:10 PM IST

Lathicharge on Maratha Protester : जालना इथं मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानं मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आज राज्यभरात मराठा आंदोलकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या घटनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निषेध केला. मात्र राज्यात इतके आंदोलनं झाली, पण आताच मराठा आंदोलनाला गालबोट का लागलं, असा सवाल त्यांनी केला.

Lathicharge on Maratha Protester
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Lathicharge on Maratha Protester : देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे साठ मोर्चे निघाले. त्यावेळी एकही मोर्चा सार्वजनिक संपत्तीचं नुकसान न होता निघाला होता. त्या दरम्यान कुठेही गालबोट ( Lathicharge on Maratha Protester In Jalna ) लागलं नाही. साठ मोर्चांना गालबोट लागलं नाही, मात्र काल अशा प्रकारचं गालबोट लागलं. मराठा समाज संयमी आहे, मराठा समाजानं नेहमीच राज्याला प्रगतीकडं नेलं. त्यामुळे या घटनेची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

आत्मपरीक्षण केलं पाहिजे : 'मीडियाशी बोलताना किंवा समाजाशी बोलताना आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जेव्हा आपल्या हातात सत्ता होती, जनतेनं तुमच्या पेनमध्ये सही करायची ताकद दिली होती. तेव्हा तुम्ही काय केलं हे आत्मपरीक्षण करून नंतर बोलले पाहिजे' असं चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले. 'जेव्हा मला अधिकार मिळाले, तेव्हा मी त्या अधिकाराचा वापर केला होता का? याचा विचार करावा. यांचं 45-45 वर्षे सरकार चाललं. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठा आरक्षणाचा निर्णय झाला. सुप्रीम कोर्टात झाला, हायकोर्टात झाला, विधिमंडळात झाला. मात्र नतद्रष्ट उद्धव ठाकरेंच्या सरकारनं सुप्रीम कोर्टात योग्य पद्धतीनं बाजू मांडली नाही. मराठा आरक्षणाचा वाद निर्माण झाला, हे सध्या मराठा समाजावर राजकारण करत आहेत', असा आरोपीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तुम्ही या, भेटा पण राजकारण करू नका. शरद पवारांनी तिथं जाऊन भेटलचं पाहिजे, अस मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं.

आताच का गालबोट लागलं : 'या आधी देखील मराठा समाजाचं राज्यात आंदोलन झालं आहे. मोठमोठे मोर्चे निघाले आहेत. आत्ताच गालबोट कसं काय लागलं, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी विचारला. राज्यातील कुठल्याही संपत्तीला नुकसान होईल, असं मराठा समाज कधीच वागत नाही. हा समाज संयमी आहे, कोणी केलं असेल हे कारस्थान, यात हाय लेवल चौकशी करून निर्णय घेतला पाहिजे', अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. 'कुठल्या समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणं म्हणजे, तेढ निर्माण करणारं ठरेल. अनेक आरक्षण कायम आहेत, सरकारला काही निर्णय घ्यावे लागतील. नियम पाळावे लागतील, केंद्र सरकारला बोलतील, मात्र कोणत्या समाजाचा वाटा कोणत्या समाजाला देणं योग्य वाटत नाही' असं उत्तरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिलं.

हेही वाचा :

  1. Lathicharge on Maratha Protester : ...म्हणून लाठीचार्ज करावा लागला; पोलिसांनी दिले स्पष्टीकरण
  2. Lathicharge on Maratha Protester : मराठा आंदोलकांवर जालन्यात लाठीचार्ज; राज्यभरात मराठा समाज आक्रमक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.