ETV Bharat / state

'हार मानायची नाय'; मनोज जरांगे पाटील 'या' तारखेला जाहीर करणार पुढची भूमिका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2023, 5:54 PM IST

Updated : Dec 17, 2023, 6:27 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

Manoj Jarange Patil : अंतरवाली सराटी याठिकाणी राज्यभरातल्या सकल मराठा समाजाची (Maratha Reservation) बैठक रविवारी पार पडली. या बैठकीचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. 24 डिसेंबरनंतर काय भूमिका घ्यायची याविषयी चर्चा करण्यासाठी जरांगे पाटील यांनी ही बैठक बोलावली होती..

जालना Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नी मनोज जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी बैठक झाली. या बैठकीत राज्यभरातील मराठा आरक्षण चळवळीत काम करणारे, स्वयंसेवक, उपोषणकर्ते आणि सभेचे नियोजन करणारे मराठा बांधव सहभागी झाले होते. यावेळी हार मानायची नसून आता केवळ गुलालच घ्यायचा, असं म्हणत मनोज जरांगे पाटील आरक्षणावर ठाम आहेत. आतापर्यंत राज्यभरात 54 लाख मराठ्यांकडे कुणबी नोंदी सापडल्या असल्याची माहितीही जरांगे यांनी दिलीये.

23 तारखेला भूमिका जाहीर करणार : मराठा आरक्षणासाठी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची डेडलाईन दिलेली आहे. मात्र, 24 तारखेपर्यंत जर आरक्षण मिळालं नाही तर काय करायचं याविषयी चर्चा झाली. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी छत्रपती संभाजी नगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात जरांगे यांची भेट घेतली. यावेळी सरकार काय करत आहे याची माहिती जरांगे यांना देण्यात आलीये. त्याचबरोबर मंत्री उदय सामंत यांचाही फोन येवून गेला असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनात माहिती देणार आहेत. त्यामुळं आजचा निर्णय हा येत्या 23 तारखेला होणाऱया बीड येथील 'इशारा सभेत' जाहीर करणार असल्याचं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

सरकार सोमवारी सभागृहात भूमिका मांडणा्र : यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहेत. 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठाम असल्याचा निरोप देण्यात आलाय. आपण काय आंदोलन करणार आहोत हे आजचं सांगितल्यास सरकारला कळून जाईल. आता मराठा समाजाला परत येऊ द्यायचं नाही. आता लढाई ताकदीने आणि युक्तीने लढाईची. सोमवारी सरकारला त्यांची भूमिका जाहीर करू द्यावी, अन्यथा तुम्ही आधीच जाहीर करून टाकल्याचं ते म्हणतील. त्यामुळे बीड येथील 23 डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेत पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार आहे.

निर्णय बीडच्या सभेत होणार : सरकारला मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. मात्र, 24 डिसेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी रविवारी अंतरवली सराटी येथे बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत ही घोषणा करण्यात आली नसून, बीड येथे होणाऱ्या 23 डिसेंबरच्या सभेत याबाबत घोषणा करण्यात येणार असल्याचा निर्णय मराठा समाजाच्या वतीनं घेण्यात आलाय. त्यामुळे आता मराठा आंदोलनाची पुढील दिशा काय असणार? याचा अंतिम निर्णय बीडच्या सभेतच होणार आहे. बीडमध्ये 23 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक, बीड बायपास मांजरसुंबा रोड येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. गिरीश महाजनांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; आरक्षणासाठी मुदतवाढ गरजेची, मंत्री महाजनांनी केलं स्पष्ट
  2. मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं - कलावंत गौतमी पाटील
  3. मराठा आरक्षणाला शरद पवार, सुप्रिया सुळेंचा सर्वाधिक विरोध- देवेंद्र फडणवीस
Last Updated :Dec 17, 2023, 6:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.