ETV Bharat / state

Maratha Reservation: सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला; सरकारला थोडा वेळ द्यावा... अर्जुन खोतकर यांची विनंती

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 3:06 PM IST

Arjun Khotkar Meets  Manoj Jarange Patil
माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी घेतली जरांगे पाटील यांची भेट

Maratha Reservation: माजी मंत्री अर्जुन खोतकर हे मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्याशी चर्चा करण्यात आली. खोतकर यांनी जारंगे यांना उपोषण मागं घेण्याची विनंती पुन्हा एकदा केली. या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

जालना : Maratha Reservation: मराठा आरक्षण प्रश्नी उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलं आहे. राज्यातील सर्व विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांच्या वतीने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांना विनंती करण्यात आली आहे. मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) व माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट (Arjun Khotkar Meets Manoj Jarange Patil) घेत त्यांना विनंती केली की, सरकारला थोडा वेळ द्यावा. मराठा समाजाच्या सर्व अटी सरकार पूर्ण करणार आहे.

आंदोलकांविरोधातले गुन्हे मागे : राज्यातील सर्व विरोधी व सत्ताधारी पक्षांची संयुक्त बैठक पार पडली. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा संदर्भात एकमताने ठराव करण्यात आलाय. राज्य सरकार जी काही भूमिका घेणार आहे त्याला सर्व विरोधी पक्षाने पाठिंबा दिला आहे. राज्यात मराठा आंदोलनादरम्यान जालना जिल्ह्यासह राज्यभरात ज्या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल केले ते तातडीनं मागे घेण्याचा ठराव सर्वपक्षीय बैठकीमध्ये घेण्यात आला. तसंच याबाबत कार्यवाहीला सुरुवातही झाली असल्याची माहिती माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे.

सरकारच्या वतीनं केली विनंती : आंदोलनरकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली होती की, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला त्या पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करावं. ही मागणी सर्वपक्षीय बैठकीमध्ये मान्य करण्यात आली. त्यानुसार त्या तीनही अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याचा ठराव सर्वपक्षीय बैठकीमध्ये करण्यात आला. त्यासंदर्भात झालेल्या सर्व निर्णयांबाबत सरकार आणि इतर सर्व पक्षांच्या वतीनं मनोज जरांगे यांना अवगत करण्यात आलंय. मनोज जरांगे यांच्या अटीही मान्य करण्यात आल्या आहेत. त्यासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं, अशी विनंती अर्जुन खोतकर यांनी सरकारच्या वतीने केली आहे.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation : संभाजी भिडेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट; उपोषण मागं घेण्याची विनंती
  2. Maratha Protest: आरक्षणासंदर्भात मराठा समाज आक्रमक; छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको, तर १७ सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास...
  3. Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागं घ्यावं; सर्वपक्षीय बैठकीत एकमतानं ठराव मंजूर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.