ETV Bharat / state

Corona Vaccine effective Other Diseases : कोरोनाची लस इतर आजारांवरही प्रभावी; लसीकरण करण्याचे नागरिकांना टोपेंचे आवाहन

author img

By

Published : Jan 31, 2022, 5:08 PM IST

Updated : Jan 31, 2022, 5:24 PM IST

health minister rajesh tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोना लस (Corona Vaccine) ही फक्त कोरोनावरच नाही तर इतर 21 प्रकारच्या आजारांसाठी लाभदायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे.

जालना - कोरोना लस (Corona Vaccine) ही फक्त कोरोनावरच नाही तर इतर 21 प्रकारच्या आजारांसाठी लाभदायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या या माहितीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करू आणि जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करणार असल्याचे टोपे म्हणाले.

प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे
  • अर्थसंकल्पात राज्याला जास्तीचा निधी द्यावा - टोपे

केंद्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अर्थसंकल्पात राज्याच्या आरोग्य विभागाला झुकतं माप देऊन जास्तीचा निधी उपलब्ध करून द्यावा, केंद्रीय पुरस्कृत मेडिकल कॉलेज मंजूर करून देण्यात द्यावेत, तसेच रुग्णालय बांधकाम निधी उपलब्ध करून द्यावा, राष्ट्रीय आरोग्य मिशनसाठी जास्तीचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.

  • विद्यार्थ्यांनी आंदोलन न करता शिक्षण विभागाला सहकार्य करावे -

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी या निर्णयाला विरोध केला असून, ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू केली आहेत. विद्यार्थ्यानी आंदोलनं न करता शिक्षण विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन टोपे यांनी केले आहे. दरम्यान, वाईन ही आरोग्यासाठी हानिकारकच असून राज्य सरकारने वाईन विक्रीबाबत घेतलेला निर्णय हा शेतीच्या दृष्टीने बघावा, असे राजेश टोपे म्हणाले. वाईन आणि गांजाची तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे कुणीही अशी तुलना करू नये, असे आवाहन देखील टोपे यांनी केले आहे.

Last Updated :Jan 31, 2022, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.