Sexual Abuse Of Minor Girl : अल्पवयीन मुलीवर लौंगिक आत्याचार, मुलगी राहिली गर्भवती

Sexual Abuse Of Minor Girl : अल्पवयीन मुलीवर लौंगिक आत्याचार, मुलगी राहिली गर्भवती
अल्पवयीन मुलीवर लौंगिक आत्याचार केल्याची घटना जालन्यातील अष्टी येथे घडली आहे. पीडिता गर्भवती राहिल्याने आरोपीच्या कृत्याचा भांडाफोड झाले आहे. आरोपींने याची वाच्यता कुठेही केल्यास पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी एका महिलेच्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परतूर - अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्यानंतर एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कुणास सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी पीडितेला आरोपींने दिल्याचे महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आरोपींने अल्पवयीन मुलीला एका महिलेच्या घरी तसेच वांरवार शेतात बोलावून अत्याचार केला असून त्यातून पीडिता गर्भवती राहिल्याचा प्रकार घडला आहे.
दोघांविरुध्द आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा - या प्रकरणी एका महिलेच्या फिर्यादीवरून दोघांविरुध्द आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. आष्टी येथील पीडित तरुणीने याबाबत फिर्याद दिली आहे की, २६ मे २०२२ रोजी संशयित गणेश बालाजी साखरे याने फुस लावून पीडितेस एका महिलेच्या घरी पळवून नेले होते. तिथे गणेश साखरे याने पीडितवर वारंवार लौंगिक आत्याचार केला.
पीडित मुलगी गर्भवती- तसेच आणखी एक संशयित योगेश सोनप्पा घेणे यांने पीडितेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत कुणास सांगितले तर जिवे मारण्याची धमकीही पीडितेस दिली. या घटनेनंतरही आरोपी महिला मागील सात महिन्यापासून पीडितेस जीवे मारण्याची धमक्या देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच योगेश घेणे याच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्यास पीडितेला भाग पाडल्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
तिघांना २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी - हा प्रकार पीडितेच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी १९ जानेवारी २०२३ रोजी पीडितेसह आष्टी पोलीस ठाण्यात येऊन महिलेसह गणेश साखरे, योगेश घेणे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यांनतर आष्टी पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने तिघांना येत्या २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती आष्टीचे सहायक निरीक्षक एस.बी.साळवे यांनी दिली.
