Thane Crime : ज्वेलर्स दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडत चोरी करण्याचा प्रयत्न; चोरटे सीसीटीव्हीत कैद

author img

By

Published : Jan 22, 2023, 6:37 PM IST

Thane Crime

डोंबिवलीत एका ज्वेलर्सच्या दुकानाच्या भिंतीला चोरटयांनी भगदाड पाडत चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दुकान मालक शांतीलाल कुंदनलाल सोनी (वय ६१) यांच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु केला.

चोरटे सीसीटीव्हीत कैद

ठाणे : डोंबिवली पश्चिमेकडील नवापाडा परिसरात काल पाहाटेच्या सुमारास दोन ज्वेलर्सच्या दुकानात चोरट्यांनी चोरी करत सोने,चांदी असे मिळून तब्बल 13 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला होता. आज पहाटेच्या सुमारास डोंबिवली पूर्वेत श्रीखंडेवाडी परिसरातील शांतीलाल कुंदनलाल सोनी यांचे राजलक्ष्मी ज्वेलर्स नावाने दागिने विक्रीचे दुकान आहे. आज पहाटेच्या सुमारास या ज्वेलर्स दुकानाला लागून असलेल्या दोन्ही दुकानांच्या भिंती फोडून चोरटयांनी राजलक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत देखील फोडण्याचा प्रयत्न केला.

दुसऱ्या दिवशीही चोरीचा प्रयत्न : चोरीचा प्रयत्न यशस्वी ठरल्याने दोन्ही चोरट्याने तिथून काढता पाय घेतला. हे दोन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी ज्वेलर्स दुकानांना लक्ष केल्याने डोंबिवलीतील ज्वेलर्स दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या वर्षी दावडी भागात एका जवाहिऱ्यावर दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आला होता. डोंबिवलीतील वाढत्या भुरट्या, घरफोड्यांमुळे नागरिक, व्यापारी हैराण आहेत.

सराफांमध्ये नाराजी : दरम्यान तीन सराफांची दुकाने फोडल्याने सराफांमध्ये खळबळ उडाली आहे. कोरोना महासाथीच्या दोन वर्षांत सराफ व्यवसाय मंदीत आहे. आता कुठे तो उभारी घेत आहे. विवाह सोहळ्यांचा हंगाम चालू आहे. त्याच लागोपाठ सलग दोन दिवस चोरी झाल्याने तिन्ही दुकानांच्या मालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर पोलिसांनीही या तिन्ही दुकानातून चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी कल्याण गुन्हे शाखाच्या पथकासह समांतर तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा: Shraddha murder case: श्रद्धा हत्याकांड प्रकरणात ३ हजार पानांचे दोषारोपपत्र तयार, १०० साक्षीदार, कशी केली हत्या, घटनेचा क्रमच सांगितला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.