jalgaon crime : सम्राट कॉलनीतील धार्मिक स्थळावर दगडफेक, परिसरात तणाव

author img

By

Published : May 20, 2023, 12:12 PM IST

धार्मिक स्थळावर दगडफेक

जळगाव शहरातील सम्राट कॉलनी परिसरातील धार्मिक स्थळावर काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. सलग दुसऱ्यांदा दगडफेकीची घटना या भागात घडली आहे.

जळगाव : शहरातील सम्राट कॉलनी परिसरातील धार्मिक स्थळावर काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. धार्मिक स्थळावर दगडफेक झाल्यामुळे काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती होताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी झाले. वेळीच पोलीस आल्याने परिसरात रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण शांतता होती.

परिस्थिती नियंत्रणात : सम्राट कॉलनी परिसरात वाढदिवसाच्या केक कापण्यावरून काही तरुणांनी दगडफेक करून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच महामार्गाजवळील सम्राट कॉलनी परिसरातील एका धार्मिक स्थळावर आज काही तरुणांकडून दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेमुळे जळगाव शहर शहरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

कोणालाच अटक नाही : या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी लगेच धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु या संदर्भात अद्यापपर्यंत कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांचा ताफा दाखल झाल्यानंतर जमावाला पांगवापांगव केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. तर परिसरातील तणाव नियंत्रणात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी ही घटना घडल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील टवाळखोरांवर कारवाई करण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा -

  1. 2 thousand note ban : नागरिकांचे अर्थ गणित बिघडवणारी 2 हजारची गुलाबी नोट का झाली बंद, काय होता इतिहास
  2. Pune Crime: लैंगिक क्षमता आणि बॉडी बिल्डिंगसाठी मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनचा वापर, इंजेक्शनच्या 95 बॉटल्स जप्त
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.