ETV Bharat / state

जालन्यात परतीच्या पावसाने छळले, बळीराजा हवालदील

author img

By

Published : Oct 25, 2019, 3:15 PM IST

Updated : Oct 25, 2019, 8:06 PM IST

परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे झालेले नुकसान

जालना जिल्ह्यात काही ठिकाणी नुकतीच ज्वारीची, सोयाबीनची पेरणी करण्यात आली. अशातच परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे सोयाबीन, ज्वारीची पिके सडून गेली आहेत. एकीकडे शेतात कामासाठी मजूर मिळत नाहीत तर दुसरीकडे पाऊसही शेतकऱ्याला छळत आहे. याच सोयाबीन च्या पिकांपर बळीराजाची दिवाळी साजरा होणार होती. त्यात कुटुंबातील सर्वांना कपडे, फराळ याप्रकारे दिवाळी साजरा होणार होती. मात्र, या परिस्थितीमुळे बळीराजाची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

जालना - जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा छळले आहे. या पावसामुळे जिल्ह्यात कापूस, ज्वारी, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे पुन्हा शेतकऱ्याची दिवाळी अधारातच जाणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

जालन्यात परतीच्या पावसाने छळले, बळीराजा हवालदील

हेही वाचा - तृतीयपंथीयांच्या विविध मागण्यांसाठी बजावला मतदानाचा हक्क - सानिया ठाकरे

जिल्ह्यात काही ठिकाणी नुकतीच ज्वारीची, सोयाबीनची पेरणी करण्यात आली. अशातच परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे सोयाबीन, ज्वारीची पिके सडून गेली आहेत. एकीकडे शेतात कामासाठी मजूर मिळत नाहीत तर दुसरीकडे पाऊसही शेतकऱ्याला छळत आहे. याच सोयाबीन च्या पिकांपर बळीराजाची दिवाळी साजरा होणार होती. त्यात कुटुंबातील सर्वांना कपडे, फराळ याप्रकारे दिवाळी साजरा होणार होती. मात्र, या परिस्थितीमुळे बळीराजाची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

हेही वाचा - पीएमसी बँक घोटाळा : वाधवान पिता-पुत्राला न्यायालयीन कोठडी

संबंधित शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्याकडे आपली व्यथा मांडली असता शेतात येऊन पंचनामे करण्यात येतील. आणि त्यानंतरच नुकसान भरपाई मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - भिवंडीत अग्नितांडव : टिव्ही संच साठवलेल्या गोदामांना भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान

तर दुसरीकडे एकीकडे हे चित्र असतानाच बदनापूर तालुक्याची जीवन दहिनी असलेला सोमठाणा येथील निम्न दुधना प्रकल्प संपूर्ण पावसाळ्यात कोरडाठाक होता. रविवारपर्यंत या प्रकल्पात एक थेंब पाणी नव्हते. मात्र, परतीच्या पावसाने शनिवार पासून लावलेल्या हजेरीमुळे धरणात जोरदार पाणी साठा झाला आहे. यामुळे बदनापूर शहरासह जवळपास 40 गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. तसेच शेतकऱ्यांनाही रब्बीच्या आशा वाढल्या आहेत. या पाण्यामुळे गहू व हरभरा पिकाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

Intro:बदनापूर, (प्रतिनिधी): परतीच्या पावसाचा प्रचंड तडाखा तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला असून खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झालेले असतानाच बदनापूर तालुक्याचा जीवन वाहिनी असलेला व बदनापूर शहरासह तालुक्यातील 40 गावाना पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत असलेल्या सोमठाणा येथील निम्न दुधना प्रकल्पात मागील आठवड्यापर्यँत एक थेंब पाणी नसताना याच परतीच्या पावसाने दोनच दिवसात पाणी साठा आल्याने रब्बीच्या आशा वाढल्या आहेत.
बदनापूर तालुक्यात यंदा सुरुवातीपासून पावसाने ओढ दिलेली होती. थोड्या फार पावसावर खरिपाची मका, सोयाबीन कापूस लागवड झालेली होती व सोंगणी करून ही पिके शेतीत काढणीसाठी तयार होती अशातच शनिवारपासून आलेल्या परतीच्या पावसाने जोरदार बरसात केली असल्यामुळे या पावसाने शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला असून ही पिके पाण्याखाली गेली. खरिपाच्या पिकाची पूर्णपणे वाताहत केली असून शेतकऱ्यांनी त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
एकीकडे हे चित्र असतानाच बदनापूर तालुक्याची जीवन दहिनी असलेला सोमठाणा येथील निम्न दुधना प्रकल्प संपूर्ण पावसाळ्यात कोरडाठाक होता. रविवारपर्यँत या प्रकल्पात एक थेंब पाणी नव्हते परंतु परतीच्या पावसाने शनिवार पासून लावलेल्या हजेरीमुळे या प्रकल्पात जोरदार पाणी साठा आला असून या प्रकल्पात पाणी आल्यामुळे बदनापूर शहरासह जवळपास 40 गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असून शेतकऱ्यांनाही रब्बीच्या आशा वाढल्या आहेत. या पाण्यामुळे गहू व हरभरा पिकाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.Body:1) शनिवार पर्यँत धरणात नसलेला पाणी साठा
2) आज पहाटे धरणात आलेले पाणी
3) खरिपाच्या पिकाच्या नुकसानी बाबत शेतकऱ्यांची प्रतिक्रियाConclusion:
Last Updated :Oct 25, 2019, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.