ETV Bharat / state

हेडफोनचा बळी..! हिंगोलीच्या युवकाचा परभणीत अपघाती मृत्यू

author img

By

Published : Apr 30, 2019, 7:55 AM IST

मृत भैय्या संजय सिरसाठ

विवाह समारंभ आटोपल्यानंतर भैया हा दुचाकीवर कानात हेडफोन घालून मामाच्या गावी परत जात होता. परभणी पासून काही अंतरावर गेल्यानंतर भैयाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.

हिंगोली - गाडी चालवत असताना आजकाल कानात हेडफोन घालून मोठ्याने गाणी ऐकायची सवय तरुणाईला लागली आहे. याच सवयीमुळे भैय्या संजय सिरसाठ (वय २४, राहणार माहेरखेडा जि. हिंगोली) याचा अपघातात मृत्यू झाला आहे.

भैय्या माहेरखेडा येथील रहिवासी आहे. तो पाथरी येथे आपल्या मामाच्या गावी शिक्षणानिमित्त राहतो. मामाच्या मुलाचा परभणी येथे विवाह सोहळा होता. विवाह समारंभ आटोपल्यानंतर भैया हा दुचाकीवर कानात हेडफोन घालून मामाच्या गावी परत जात होता. परभणी पासून काही अंतरावर गेल्यानंतर भैयाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. धडकेमुळे जखमी अवस्थेत भैय्या रस्त्याच्या कडेला जावून पडला. रात्रीची वेळ असल्याने जखमी अवस्थेत पडलेल्या भैय्याला मदत मिळू शकली नाही.

घटनेची माहिती मिळताच परभणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना भैय्याच्या कानात हेडफोन आढळून आला. परभणी येथील जिल्हासामान्य रुग्णालयात भैय्याला उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी भैयाला तपासून मृत घोषित केले.

Intro:सध्या तरुण तरुणीला मोबाईलचे एवढे वेड लागले आहे, की ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मोबाईल हाताळत आहेत. एवढेच नव्हे तर काही जण तर दुचाकीने प्रवास करताना कानात हेडफोन घालून जोरजोरात गाणे ऐकत प्रवास करताना दिसत आहेत. मात्र याच हेड फोन मुळे एका युवकाचा बळी गेलाय. भैया संजय सिरसाठ (२४) रा. माहेरखेडा जि. हिंगोली अस अपघात मृत्यू झालेल्या युवकाच नाव आहे. या युवकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली होती.





Body:भैय्या हा मूळचा माहेरखेडा येथील रहिवासी आहे. तो अगदी पाथरी येथेच आपल्या मामाच्या गावी शिक्षणा निमित्त राहतो. आज मामाच्या मुलाचा परभणी येथे विवाह सोहळा होता. त्यामुळे तो आपल्या मामाच्या मुलाच्या लग्ना निमित्त परभणी येथे आला होता. विवाह समारंभ आटोपल्यानंतर पाहुणे मंडळी आप आपल्या गावाकडे रवाना झाले, तसेच भैयांचे आई-वडील देखील गावाकडे निघून गेले. अन भैया हा दुचाकीवर कानात हेड फोन घालून पाथरी मार्गे आपल्या मामाच्या गावी परत जात होता. परभणी पासून काही अंतरावर गेल्यानंतर भैयाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात भैया हा जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला जाऊन पडला. रात्रीची वेळ असल्याने जखमी अवस्थेत पडलेल्या भैया ला मदत मिळू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच परभणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अन जखमी अवस्थेत पडलेल्या युवकाच्या कानात हेडफोन आढळून आला. त्याला परभणी येथील जिल्हासामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर डॉक्टरानी तपासून भैयाला मृत घोषित केले.


Conclusion:या घटनेने मात्र एकच खळबळ उडालेली आहे. कदाचित भैयाच्या कानात हेड फोन नसते तर अपघात टळला असता. त्यामुळे हेड फोन कसे जीवावर बेतू शकतात हेच या घटनेवरून दिसून येते.



मयताचा फोटो मेल केला आहे. बातमीत वापरावे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.