ETV Bharat / state

'शेवटच्या श्वासापर्यंत खेड्या-पाड्यातील लोकांची साथ देईन'

author img

By

Published : Sep 20, 2019, 10:24 AM IST

Updated : Sep 20, 2019, 12:13 PM IST

मला जनतेने सर्व काही दिले. 14 वेळा निवडून दिले, चार वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केले, केंद्रात मंत्री केले, त्यामुळे आता माझा श्वास चाले पर्यंत मी खेड्या पाड्यातील लोकांची साथ देईन, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार

हिंगोली - राज्याच्या आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर सर्वपक्षीय नेते खडबडून कामाला लागले आहेत. यात सध्या राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपात प्रवेश घेत आहे. मात्र त्यांच्या जाण्याने पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांना जनताच या विधानसभेत जागा दाखवुन देणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वसमत येथे झालेल्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले आहे. तसेच कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून येथील जागा ही राष्ट्रवादीचीच असेल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला आहे.

'श्वास चाले पर्यंत खेड्या पाड्यातील लोकांची साथ देईन' - शरद पवार

हेही वाचा... अखेर युतीच गणित ठरलं! शिवसेनेला भाजपचा प्रस्ताव मान्य

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात सरकारवर जोरदार टिका केली. 'सरकार शेतऱ्यांच्या मुळावर बसलंय आणी शेतकऱ्यांची लूट चालली आहे. मात्र या सरकारला शेतकऱ्याचे अजिबात देणे घेणे नाही. एवढेच नव्हे तर स्वतः अमित शहा यांनी देखील एका कार्यक्रमात शेतकऱ्यांचे आम्ही अजिबात कर्जमाफी करणार नाही, गरज पडली तर मात्र कारखानदारांचे आवर्जून कर्ज माफ करू, असे बोलल्याचे पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यात म्हटले आहे.

हेही वाचा... कर्जत-जामखेड, पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीत बंडखोरीची शक्यता...

हे सरकार शेतकऱ्यांसाठी नव्हे तर कारखानदारासाठी धावून जाणारे - पवार

आमच्या काळात मी कृषिमंत्री असताना सर्वप्रथम शेतकऱ्यांचा विचार केला जात असे. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी दुष्काळ या अडचणीत अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठीच प्रयत्न करत होतो., मात्र आता शेतकऱ्यांवर एवढी वाईट परिस्थिती विद्यमान सरकारने आणली आहे की, या देशात 16 हजार शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी केंद्र अन राज्यसरकारची आहे. ही जबाबदारी पूर्णपणे पेलली तर आत्महत्या थांबतील, असे पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा... शेतकऱ्यांचा स्वाभिमानी 'वाघ' आता विधानसभेच्या रणांगणात?

'उद्याचा महाराष्ट्र घडवणाऱ्या नेतृत्वाची नवीन फळी निर्माण करायची आहे'

विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत. मात्र त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीवर अजिबात परिणाम होणार नाही. उलट त्यांना जनताच विधानसभेत जागा दाखवुन देणार आहे. वास्तविक पाहता जे पक्ष सोडून गेले त्यांना मागील पंधरा वर्षात पक्षाने मोठे केले होते, अशी टिका पवारांनी पक्ष सोडलेल्या नेत्यांवर केली आहे. तसेच राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी नवीन नेतृत्व तयार करणे गरजेचे आहे, म्हणूनच आपण राज्यस्तरीय दौरा करत असल्याचे पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

'मोदी है तो मुमकिन है' अशी परिस्थिती सध्या अजिबात नाही'

2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन खोटे ठरले आहे. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांचे कर्ज माप न करता सरकारने कारखाने देखील बंद पाडले आहेत. कारखाने बंद पडल्याने 4 लाख लोकांवर उपासमार येऊन ठेपली आहे. 'मोदी है तो मुमकिन है' अशी परिस्थिती सध्या अजिबात नाही., असे बोलत देशातील आर्थिक परिस्थीतीवर पवारांनी भाष्य केले.

Intro:विधानसभेच्या तोंडावर सर्वपक्षीय नेते खडबडून कामाला लागले आहेत. तर सध्या राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपात प्रवेश घेत आहे. मात्र त्यांच्या जाण्याने पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. त्याना जनताच या विधानसभेत जागा दाखवुन देणार असल्याचे शरद पवार यांनी वसमत येथे झालेल्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले. मात्र येथील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून निश्चितच येथील जागा ही राष्ट्रवादीचीच असेल असा विश्वास ही पवार यांनी दाखविला.


Body:हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळाव्यात सरकार कस शेतऱ्याच्या मुळावर बसलय अन कशी लूट चाललीय याची परिस्थिती सांगितली. मात्र या सरकारला शेतकऱ्याचे अजिबात देणे घेणे नाही. एवढेच नव्हे तर स्वतः अमित शहा यांनी देखील एका कार्यक्रमात शेतकऱ्यांचे आम्ही अजिबात कर्ज माप करणार नाहीत गरज पडली तर मात्र खरखानदारांचे आवर्जून कर्ज माप केले जाईल असे सांगितल्याचे पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांसाठी नव्हे तर कारखानदारासाठी धावून जाणारे सरकार आहे. आमच्या काळात मी कृषिमंत्री असताना सर्वप्रथम शेतकऱ्यांचा विचार केला जायचा तो कोणत्याही बाबतीत असो, कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी दुष्काळ या अडचणीत अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठीच प्रयत्न करत गेलो. मात्र आता शेतकऱ्यावर एवढी वाईट परिस्थिती या सरकारने आणलीय. या देशात 16 हजार शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केलीय. अजून दुसरे दुर्दैव कोणते? असा सवाल या सरकारला विचारला. वास्तवीक पाहता शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारीच मुळात केंद्र अन राज्यसरकारची आहे. ही जबाबदारी पूर्णपणे पेलली तर आत्महत्या थांबतील. तसेच विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते भाजप मध्ये प्रवेश घेत आहेत. मात्र त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीवर अजिबात परिणाम होणार नाही. मात्र त्याना जनता याच विधानसभेत जागा दाखवुन देणार आहे. वास्तविक पाहता जे पक्ष सोडून गेले त्यानाच मागील पंधरा वर्षात पक्षाने मोठे केले. तसेच फोडाफोडीचे राजकारण हे माझ्यासाठी अजिबात नवीन नाही. जे सोडून गेले त्याना आता मतदारच त्यांची जागा दाखवून दिल्या शिवाय राहणार नाही. जी या सरकार च्या काळात भांबावून गेलेली जनता आहे. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी नवीन नेतृत्व तयार करणे गरजेचे आहे म्हणूनच मी हा राज्यस्तरीय दोरा करीत असल्याचे पवार यांनी सांगितले.


Conclusion:एवढेच नव्हे तर या सरकरणे रोजगार देण्याची घोषणा केली होती. मात्र ती देखील हवेतच विरल्याचा आरोप पवार यांनी केला. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांचे कर्ज माप न करता सरकारने कारखाने देखील बंद पाडले. जे की माझ्या काळात विविध ठकाणी 44 कारखाने सुरू केले होते त्यातील आज घडली 30 कारखाणे जेम तेम सुरू असतील. कारखाने बंद पडल्याने 4 लाख रोजगारावर उपासमार येऊन ठेपलीय. तुम्हाला खरच उत्पादन कर्त्याला न्याय देयाचा असेल तर यासाठी तुम्हा सर्वांचीच मदत घेतोय. आता ज्यांची त्यांची कामे वाटून दिली असल्याचे ही पवार यांनी सांगितले. आपल्या कडे अपलोड झालेले व्हिज्युअल बातमी त वापरून घ्यावेत.
Last Updated : Sep 20, 2019, 12:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.