ETV Bharat / state

Road Accident In Hingoli : कळमनुरी नांदेड महामार्गावर भीषण अपघात, उभ्या ट्रकला आयशर धडकून 4 जण ठार

author img

By

Published : May 26, 2023, 8:07 AM IST

Updated : May 26, 2023, 8:50 AM IST

हिंगोली नांदेड महामार्गावर उभ्या ट्रकला आयशर धडकून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा अंत झाला. या अपघातात अनेक शेळ्या मेंढ्यांचाही मृत्यू झाला आहे.

Road Accident In Hingoli
घटनास्थळावरील अपघातग्रस्त आयशर

हिंगोली : उभ्या ट्रकला आयशर धडकून झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ही घटना कळमनुरी नांदेड महामार्गावर घडली असून यात 125 मेढ्यांचाही मृत्यू झाला आहे. अपघाताची घटना घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य केले. मात्र या अपघातग्रस्तांना वाचवण्यात नागरिकांना यश आले नाही.

तब्बल 125 मेंढ्यांचा मृत्यू : कळमनुरी तालुक्यातील हिंगोली- नांदेड रस्त्यावरील माळेगाव जवळ मेंढ्या घेऊन जाणारा आयशर ट्रक फरशी घेऊन जाणाऱ्या ट्रकवर जाऊन जोरात धडकला. या धडकेत ट्रकमधील चार जण ठार झाले असून तब्बल 125 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना 25 मे रोजी पहाटे सहाच्या सुमारास घडली.

चालकाला डुलकी लागल्याने अपघात : कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माळेगाव येथील एका हॉटेलसमोर फरशी घेऊन जाणारा ट्रक उभा होता. यावेळी राजस्थान येथून हैदराबादकडे मेंढ्या घेऊन निघालेल्या आयशर टेम्पो (एच आर ५५ एपी ३१११) चालकाला डुलकी लागली अन ट्रक थेट जाऊन फारशीने भरलेल्या ट्रकवर जाऊन धडकला. या धडकेत आयशरच्या कॅबिनमध्ये बसलेल्या तीन आणि ट्रकमध्ये बसलेला एक असे चार जण ठार झाले. सलमान अलीम नासेर खा, सत्यनारायण प्रल्हाद बळावई, अलीम गुळशेर यादगार आणि एकाचे मात्र नाव कळू शकले नाही. या भीषण अपघातात मेंढ्या घेऊन निघालेल्या टेम्पोमधील तब्बल 125 मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. तर 50 ते 60 मेंढ्यांना ट्रक बाहेर काढण्यात यश आले.

वाहतुकीचा झाला खोळंबा : घटनेची माहिती मिळताच कळमनुरीचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहायक पोलीस निरीक्षक रेखा शहारे व त्यांच्या इतर साथीदारांनी घटनास्थळ गाठले. जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले. तर मेंढ्याचा आयशर टेम्पो हा क्रेनच्या मदतीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी वाहतुकीचा बराच खोळंबा झाला होता. महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले.

हेही वाचा -

  1. Mumbai Suicide : धारावीतील एका हॉटेलमध्ये ३४ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
  2. Molestation Case : अमृता फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ दुसऱया महिलेला पाठवणे पडले महागात; तरुणावर विनयभंगाचा गुन्हा
  3. Thane crime: चुलत भावाच्या सासऱ्याला फोन केल्याचा संशय, अपहरण करून तरूणाला केली बेदम मारहाण

Last Updated : May 26, 2023, 8:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.