ETV Bharat / state

हिंगोलीत कोरोना योद्धा पुरस्काराच्या नावांमध्ये हेराफेरी? दुसरीच नावाची यादी पुढे पाठविल्याचा आरोप

author img

By

Published : Oct 14, 2020, 7:49 PM IST

कोरोना योद्धा पुरस्कारासाठी वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचा विचार व्हावा, अशी मागणी वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली आहे.

हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालय
हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालय

हिंगोली - कोरोना काळामध्ये उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोना योद्धा म्हणून राज्यपालांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. यासाठी संपूर्ण राज्यातील आरोग्य विभाग इतर कर्मचाऱ्यांची नावे पाठवली आहेत. मात्र पुरस्कारासाठी पाठवलेल्या नावाची दुसरीच यादी पाठविल्याचा आरोप करीत आज जिल्हा सामान्य रुग्णालयात गोंधळ करून वर्ग चारच्या ही कर्मचाऱ्यांचा विचार व्हावा, अशी मागणी शल्यचिकित्सक यांच्याकडे केली आहे. त्यामुळे गौरव होण्याअगोदरच हा पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

कोरोना महामारीच्या काळामध्ये पहिल्या कोरोना बाधित पहिल्या रुग्णापासून ते आतापर्यंत अनेक परिचारिका डॉक्टर, सफाई, कामगार आदींनी चोख कर्तव्य बजावले आहे. वास्तविक पाहता तो काळ तर एवढा भयंकर होता की, साधं कोरोना म्हटलं तरीही अंगावर शहारे उभे राहायचे. मात्र अशाही विदारक परिस्थितीमध्ये अनेक परिचारिका डॉक्टर इतरांनी खूप कर्तव्य बजावले आहे. त्यावेळी तर आपली पुरस्कारासाठी निवड होईल, हे देखील कोणत्याही कर्मचार्‍याच्या ध्यानी- मनी ही नव्हते. मात्र जेव्हा नावे घोषित झाली तेव्हा हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिका जयश्री फत्तेपुरे, सेवक संदीप मोरे अन घोळवा येथील आशा वर्कर शोभा तोरकड या तिघांची हिंगोली जिल्ह्यातून निवड केली आहे. मात्र हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयातून निवड झालेल्या कोरोना योद्धामुळे इतर कर्मचाऱ्यांचे अवसान गळाले आहेत.

प्रत्येक जण स्वतःचे काम आठवत आता पुढे कसे कर्तव्य बजावण्याचे यासंदर्भात विचाराधीन आहेत. काही-काही तर परिचारिका रात्री-अपरात्री कोरोना वार्डमध्ये कर्तव्य बजावत असल्याचे ही मोठ्या पोटतिडकीने सांगत आहेत. तर आज वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकिस्तक यांच्याकडे आमचाही कोरोना योद्धा म्हणून पुरस्कारासाठी विचार व्हावा, या मागणीचे निवेदन दिले आहे.

एकंदरितच कोरोना योद्धा पुरस्कारामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात चांगलाच गदारोळ सुरू आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हिंगोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने रुजू झालेले शल्यचिकित्सक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर यापुढे अजिबात दुर्लक्ष केले जाणार नाही, ज्याचे उत्कृष्ट कर्तव्य असेल त्याचा निश्चितच पुरस्कारासाठी विचार केला जाईल असे, नुकतेच रुजू झालेले शल्यचिकित्सक सूर्यवंशी यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.