ETV Bharat / state

शेतकऱ्याची किमया; खडकाळ जमिनीत फळवर्गीय पिकासोबत घेतले शेवग्याचे पीक

author img

By

Published : Feb 27, 2021, 5:02 PM IST

Hingoli Farmer Success Story
हिंगोली शेतकरी यशकथा न्यूज

शेतामध्ये शेवग्याच्या शेंगा व टरबुजाच्या वेलींना चांगल्या दर्जाचे टरबूज लगडलेली आहेत. त्यामुळे खडकाळ जमिनीमध्ये कष्ट केल्याचे चीज वाटत असल्याचे शेतकरी संजय वाकोडे सांगतात. सध्या कोरोनाची साथ सुरू असल्याने ही फळे व शेंगा विक्री करण्यासाठी बाजारपेठेमध्ये प्रचंड अडचण निर्माण होत आहे. एवढे झालेले असले तरी दोन ते तीन लाख रुपयांचा नफा या हंगामात झाला आहे. यंदादेखील दोन लाखांची अपेक्षा असल्याचे शेतकरी वाकोडे यांनी सांगितले.

हिंगोली - वलाना येथील एका तरुण शेतकऱ्याने खडकाळ जमिनीत शेवग्याचे आणि टरबूजाचे पीक यशस्वीरीत्या घेतले आहे. सेनगाव तालुक्यातील या शेतकऱ्याच्या मेहनतीमुळे त्याच्या शेतातील शेवग्याला भरघोस शेंगा लगडल्या आहेत. या शेवगा पिकात आंतरपीक म्हणून त्याने टरबूजाचे पीक घेतले आहे. संजय वाकोडे (रा. वलाना जि. हिंगोली) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

Hingoli Farmer Success Story
हिंगोली शेवगा, टरबूज पीक
हिंगोली : शेवगा शेतीत घेतले टरबूजाचे आंतरपीक
वाकोडे यांनी पाच एकरामध्ये शेवग्याची लागवड केली आहे. वेळोवेळी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेत योग्य खताची मात्रा देऊन ओडिशा जातीची शेवग्याची झाडे त्यांनी शेतात जगवली आहेत. वास्तविक पाहता ही शेवग्याची रोपे पंढरपूर येथून आणण्यात आलेली आहेत. अडीच एकरमध्ये वसंत जातीचे शेवगा तर अडीच एकर मध्ये ओडिशा जातीचा शेवगा लावण्यात आलेला आहे. ह्या दोन्ही जाती खडकाळ माळरानात चांगल्या प्रकारे उगवून आल्या असून अवघ्या सहा महिन्यांतच या शेवग्याच्या झाडांना शेंगाही धरलेल्या आहेत. आंतरपीक म्हणून वाकोडे यांनी नामदेव उमाजी जातीचे टरबूज घेतलेले आहे. त्यालादेखील योग्य पद्धतीने नियोजन करून पाणी दिले जाते. यातून शेवग्याची झाडाची वाढ तर होतच आहे. याला चांगल्या प्रकारे शेंगाही आल्या आहेत. सध्या कोरोनाचा काळ असल्याने काही प्रमाणात शेवग्याच्या शेंगा विक्री करण्यासाठी फटका बसत आहे.कोरोनाची सोसावी लागतेय झळ

शेतामध्ये शेवग्याच्या शेंगा व टरबुजाच्या वेलींना चांगल्या दर्जाचे टरबूज लगडलेली आहेत. त्यामुळे खडकाळ जमिनीमध्ये कष्ट केल्याचे चीज वाटत असल्याचे शेतकरी संजय वाकोडे सांगतात. सध्या कोरोनाची साथ सुरू असल्याने ही फळे व शेंगा विक्री करण्यासाठी बाजारपेठेमध्ये प्रचंड अडचण निर्माण होत आहे. ग्राहकांचाही फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे याचा फटका चांगलाच सहन करावा लागत असल्याचे वाकोडे यांनी सांगितले.

Hingoli Farmer Success Story
हिंगोली शेवगा, टरबूज पीक
रात्रंदिवस राबल्याच्या कष्टाचे झाले चीज

शेतात शेवगा व टरबूज पीक लहानाचे मोठे करण्यासाठी अहोरात्र केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान वाटत असल्याचे वाकोडे सांगतात. अकोला, वाशिम, कारंजा, मुंबई, परभणी, रिसोड येथेही ह्या शेवग्याच्या शेंगा विक्रीसाठी जातात. मागील वर्षी देखील चांगले उत्पादन झाले होते. मात्र, कोरोनामुळे नुकसान सहन करावे लागले. एवढे झालेले असले तरी दोन ते तीन लाख रुपये या हंगामात मिळाले. यामुळे नफा-तोटा समसमान झाला आहे. यंदा दोन लाखांच्या नफ्याची अपेक्षा असल्याचे शेतकरी वाकोडे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.