ETV Bharat / state

डाळिंबाला बाजारपेठ मिळेना, बागेवर फिरवला जेसीबी

author img

By

Published : Aug 1, 2020, 7:01 PM IST

डाळिंब बाग नष्ट करताना
डाळिंब बाग नष्ट करताना

डाळिंबाला बाजारपेठ मिळत नसल्याने एका शेतकऱ्याने अडीच एकरातील डाळिंब झाडांवर जेसीबी फिरवला.

हिंगोली - सेनगाव तालुक्यातील सुलदली बुद्रुक येथील एका शेतकऱ्याने डाळिंबाला बाजारपेठ मिळत नसल्याने अडीच एकरातील डाळिंब झाडांवर जेसीबी फिरवला. शेतकऱ्याने वैतागून डाळिंबासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी कृषी विभागाकडे केली आहे.

डाळिंब शेती करण्याचा एक चांगला प्रयत्न सुलदली येथील नितीन गोरे या शेतकऱ्याने केला होता. लाखो रुपये खर्च करून अडीच एकरमध्ये त्यांनी पट्टा पद्धतीने डाळिंबाच्या हजार झाडांची लागवड केली. ही बाग जोपासण्यासाठी त्यांना मजूर, फवारणी, आंतरमशागत, तलाव खोदणे व पाईपलाईन असा एकूण दहा लाखाच्यांवर खर्च आला. सलग दोन वर्ष बाग जोपासली. तिसऱ्या वर्षी फळ लागले, तर पहिल्याच टप्प्यातून त्यांना सात ते आठ लाखांचे उत्पन्न अपेक्षित असताना, केवळ चार लाख रुपये मिळाले. त्यामुळे ते निराश झाले.

डाळिंबाला हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठी बाजारपेठ नाही. डाळिंबाचे उत्पादन झाल्यानंतर परजिल्ह्यामध्ये धाव घ्यावी लागते. यातून वाहन खर्च, मिळणारा भाव आदी समस्यांना डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. एकंदरीत बाग तोट्यात जात असल्याने शेतकऱ्याने जेसीबीने बाग उपटून टाकली. इतर डाळिंब उत्पादकांना बाजारपेठ मिळण्याचा त्रास होऊ नये, यासाठी जिल्ह्यात डाळिंब आयटी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

त्यामुळेच या शेतकऱ्यांनी आपल्या अडीच एकर मधील डाळिंबावर जेसीपी फिरविला आहे. एवढेच नव्हे तर सदरील शेतकरी हा निदान जिल्ह्यातील इतर शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये म्हणून हिंगोली जिल्ह्यात डाळिंब आयटी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी करत आहेत. पात्र एवढे कष्टाने लहानाची मोठी केलेली डाळिंबाची झाडे उपटून टाकल्यानंतर या शेतकऱ्यांची परिसरात जोरदार चर्चा होत आहे.

याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी डाळिंबासाठी बाजारपेठ मिळू शकते, त्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करता येऊ शकतो. बाजारपेठ शोधण्यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागते असे म्हटले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.