ETV Bharat / state

Sholay Style Protest : आरमोरीतील कंत्राटी कामगारांचे गडचिरोलीतील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

author img

By

Published : Feb 16, 2022, 4:56 PM IST

Updated : Feb 16, 2022, 6:08 PM IST

Sholay Style Protest
शोले स्टाईल आंदोलन

आरमोरी नगरपालिकेच्या (Aarmori Nagarpalika) 20 कामगारांनी गडचिरोली शहरातील मुख्य गांधी चौकातील पाणीटाकीवर चढून आंदोलन (Sholay Style Protest) केले. या कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून काढून टाकले होते. कंत्राटदाराकडे किमान वेतनाची मागणी केल्यानंतर कंत्राटदाराने निलंबनाची कारवाई केली होती. या विरोधात कामगारांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता.

गडचिरोली - जिल्ह्यातील आरमोरी नगरपालिकेच्या 20 कामगारांनी (Aarmori Nagarpalika Workers Protest) गडचिरोली शहरातील मुख्य गांधी चौकातील पाणीटाकीवर चढून आंदोलन (Sholay Style Protest) केले. आरमोरी शहरात कार्यरत या कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून काढून टाकले होते. कंत्राटदाराकडे किमान वेतनाची मागणी केल्यानंतर कंत्राटदाराने निलंबनाची कारवाई केली होती. या विरोधात कामगारांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र, त्यानंतरही कुठलाही तोडगा निघत नसल्याने पाणी टाकीवर चढून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे.

गडचिरोलीत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

मुख्य गांधी चौकात थेट पाणी टाकीवर चढलेल्या आंदोलकांमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, गडचिरोली पोलीस ठाण्याचे पथक आंदोलकांशी वाटाघाटी करत घटनास्थळी तैनात आहे.

पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन -

गडचिरोली शहरात कंत्राटी कामगारांची वीरूगिरी बघायला मिळाली. जिल्ह्यातील आरमोरी नगरपालिकेचे 20 कामगार मुख्य गांधी चौकातील पाणी टाकीवर चढले. या कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून अचानक काढून टाकले होते. कंत्राटदाराकडे किमान वेतनाची मागणी केल्यानंतर कंत्राटदाराने तडकाफडकी कारवाई केली होती. या अन्यायाविरोधात कामगारांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र त्यानंतरही कुठलाच तोडगा निघत नसल्याने पाणी टाकीवर चढून त्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे.

Last Updated :Feb 16, 2022, 6:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.