ETV Bharat / state

अखेर 15 वर्षांचा वनवास संपला, देवलमारी नाल्यावरील पुलाचे बांधकाम पूर्ण

author img

By

Published : Jul 17, 2020, 6:50 PM IST

MLA Dharmarao Atram inaugurates bridge over Devalmari Nala in Aheri
आमदार धर्मराव आत्राम यांच्या हस्ते अहेरीतील देवलमारी नाल्यावरील पुलाचे उद्घाटन

अहेरी तालुक्यातील देवलमारी नाल्यावर पूल नसल्याने पलीकडे असलेल्या 18 गावातील नागरिकांचा पावसाळ्यात संपर्क तुटत होता. आज (शुक्रवार) अहेरीचे आमदार धर्मराव आत्राम यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले.

गडचिरोली - जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील देवलमारी नाल्यावर पूल नसल्याने पलीकडे असलेल्या 18 गावातील नागरिकांचा पावसाळ्यात संपर्क तुटत होता. या 18 गावातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड देत अहेरी तालुका मुख्यालय गाठावे लागत होते. मात्र, ही समस्या 15 वर्षानंतर दूर झाली आहे. देवलमरी नाल्यावर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याचे उद्घाटन झाले आहे. त्यामुळे आता थेट सिरोंचा तालुक्यातील रेंगुठा गावापर्यंतचा भाग जोडला आहे.

अहेरीचे आमदार धर्मराव आत्राम यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, शाहीन हकीम, मुतन्ना दोन्तुलवार, आलापल्लीचे कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम, उपविभागीय अभियंता राजकुमार नाकले, कंत्राटदार व्हि. बी. बोम्मावार आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार धर्मराव आत्राम यांच्या हस्ते अहेरीतील देवलमारी नाल्यावरील पुलाचे उद्घाटन

हेही वाचा - भाजपाच्या 'त्या' ट्वीटनंतर आली जाग, 21 जुलैला स्वाभिमानीकडून राज्यव्यापी 'दूध बंद आंदोलन'

'गाव तिथे रस्ता व गाव तिथे बस सेवा' आवश्यक आहे. विकासासाठी रस्ते व दळणवळणाची अधिक गरज असून त्यासाठी रस्ते व नाल्यांवरील लहान-मोठे पुल उभारले जावे. या विषयावर मुख्यमंत्री यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत जिल्ह्यातील पुलांच्या बांधकामासाठी अतिरिक्त निधी देण्याची मागणी केली. त्यांनी आपली मागणी मान्य केली असून आता दरवर्षी रस्ते व पुल बांधकाम होणार आहे. नागरिकांनी बांधकामासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे प्रतिपादन आमदार धर्मराव आत्राम यांनी यावेळी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.