ETV Bharat / state

गडचिरोलीतील 13 विद्यार्थीनी कोरोना पॉझिटीव्ह

author img

By

Published : Jan 11, 2021, 7:01 PM IST

13-students-from-gadchiroli-tested-corona-positive
गडचिरोलीतील 13 विद्यार्थीनी कोरोना पॉझिटीव्ह

पालकांचे संमती पत्र घेऊन इयत्ता नववी ते बारावीपर्यंतची शाळा सुरू करण्याची परवानगी दिली खरी; पण कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झाल्याचे दिसून येत नाही. कोरची तालुक्यातील चार शाळांमधील १३ विद्यार्थिनींची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

गडचिरोली - केंद्र व राज्य सरकारने पालकांचे संमती पत्र घेऊन इयत्ता नववी ते बारावीपर्यंतची शाळा सुरू करण्याची परवानगी दिली खरी; पण कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झाल्याचे दिसून येत नाही. कोरची तालुक्यातील चार शाळांमधील १३ विद्यार्थिनींची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

विद्यार्थ्यांवर ओढवले संकट -

राज्य शासनाच्या आदेशानुसार २३ नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्याअनुषंगाने शाळा निर्जंतुकीकरण, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर अलीकडेच विद्यार्थ्यांचीही आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात कोरची येथील पार्बताबाई विद्यालयाच्या ५, शासकीय निवासी आश्रमशाळेची १, श्रीराम विद्यालयाची १ व बेतकाठी येथील धनंजय स्मृती विद्यालयाच्या ६ अशा एकूण १३ विद्यार्थिनीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे पालक चिंताग्रस्त झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच गडचिरोली येथील शासकीय निवासी आश्रमशाळेतील ३ विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. त्यानंतर आता कोरची तालुक्यातील विद्यार्थ्यांवर हे संकट ओढवले आहे.

शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह-

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या गडचिरोली शहरातील शासकीय इंग्रजी माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेतील तीन विद्यार्थी कोरोना पॉझिटिव आढळून आले होते. आदिवासी आश्रम शाळेतील विज्ञान शाखेच्या निवडक १०१ विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी गडचिरोलीच्या आश्रम शाळेत बोलवण्यात आले. यामध्ये ९३ विद्यार्थी दाखल झाले. येथे दाखल सर्व विद्यार्थ्यांची दोन दिवस आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. यामध्ये बारावीचे दोन तर अकरावीचा एक विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला होता.

हेही वाचा - ईटीव्ही एक्सक्लुजीव : कोरोना लस देशभर पोहोचवण्यासाठी 'कुल एक्स कोल्ड चैन' सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.