ETV Bharat / state

तीन वर्षांपूर्वी मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाबाबत धुळेकर म्हणतात...

author img

By

Published : Nov 8, 2019, 1:46 PM IST

तीन वर्षांपूर्वी आठ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली आणि सर्वांनाच धक्का बसला. देशातील काळा पैसा आणि नकली नोटांची समस्या संपवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सरकारने सांगितले. तील वर्षे उलटली असली तरी हा निर्णय आजही लोकांसाठी चर्चेचा विषय आहे.

तीन वर्षांपूर्वी मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाबाबत धुळेकरांच्या प्रतिक्रीया

धुळे - तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री आठ वाजता दूरदर्शनवरून देशाला संबोधित केले होते. यात त्यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली आणि सर्वांनाच धक्का बसला. देशातील काळा पैसा आणि नकली नोटांची समस्या संपवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सरकारने सांगितले. तील वर्षे उलटली असली तरी हा निर्णय आजही लोकांसाठी चर्चेचा विषय आहे.

तीन वर्षांपूर्वी मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाबाबत धुळेकरांच्या प्रतिक्रीया

मोदी सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या नोट बंदीच्या निर्णयाबाबत सर्वसामान्य नागरिकांमधून मात्र आजही विरोध व्यक्त होताना दिसून येत आहे. नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था ही खिळखिळी झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. व्यापारी वर्गाला देखील याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून नोटबंदीचे कोणतेही उद्दिष्ट साध्य झालेले नाही. याउलट भारतीय अर्थव्यवस्था आणखी धोक्यात आली आहे, अशा प्रतिक्रीया धुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा - आठ नोव्हेंबर : आजच्याच दिवशी तीन वर्षांपूर्वी झाली होती नोटबंदी

नोटबंदीच्या काळात आणि नंतरही नागरीकांना झालेला त्रास ते आजही विसरू शकलेले नाहीत हे या लोकांच्या बोलण्यातून जाणवते. नोटबंदीचा निर्णय घेणाऱ्या नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी असा सल्लाही तो पंतप्रधान मोदींन देत आहेत.

Intro:मोदी सरकारने गेल्या तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या नोट बंदीच्या निर्णयाला सर्वसामान्य नागरिकांमधून आजही विरोध व्यक्त होताना दिसत आहे. या नोटबंदी मुळे देशाची अर्थव्यवस्था ही खिळखिळी झाली असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा सर्वाधिक नुकसान झाला आहे. व्यापारी वर्गाला देखील याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून नोटबंदी ने कोणतेही उद्दिष्ट साध्य झालेलं नाही उलट यामुळे भारतीय अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. नोटबंदीचा निर्णय घेणाऱ्या नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी अशी प्रतिक्रिया धुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.


Body:धुळे: नोटबंदी चौपाल


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.