ETV Bharat / state

धुळ्यातील बाळापूर परिसरात छापा टाकून पोलिसांनी मद्यसाठा केला हस्तगत

author img

By

Published : Jul 31, 2020, 9:35 AM IST

धुळे
धुळे

धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बाळापुर या गावाच्या शिवारात हॉटेल खान्देश मेवाच्या आडोशाला सुमित भावसार हा व्यक्ती अवैधरित्या देशी व विदेशी दारूची साठवण करून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

धुळे - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने बाळापुर शिवारात छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईमुळे अवैधरित्या मद्याची साठवणूक करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बाळापुर या गावाच्या शिवारात हॉटेल खान्देश मेवाच्या आडोशाला सुमित भावसार हा व्यक्ती अवैधरित्या देशी आणि विदेशी दारुची साठवण करुन विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी तत्काळ एक पथक तयार केले आणि माहिती मिळालेल्या ठिकाणी अचानक छापा टाकण्याचे आदेश दिले. पोलिसांनी तेथे छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात देशी आणि विदेशी मद्याचा साठा आढळून आला आहे. याबाबत धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.