ETV Bharat / state

नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, धुळ्यात भाजपाची मागणी

author img

By

Published : Mar 19, 2021, 3:57 PM IST

bjp-protest-against-state-government-in-dhule
राज्य सरकारविरोधात धुळ्यात भाजपाचे आंदोलन..

पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारीच पोलिस दलात काहींनी चुका केल्याचे सांगत आहे, हे सर्व गंभीर असून यामुळे राज्याची बदनामी होत आहे. नैतिकतेच्या पातळीवर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत भाजपाने धुळ्यात महापालिकेनजीक शासनाच्या पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदविला.

धुळे - आज शुक्रवारी महापालिकेजवळील गुरुशिष्य स्मारकासमोर राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. राज्य शासनाच्या धोरणाविषयी संताप व्यक्त करत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा दिल्या.

मंत्र्यांवर केले आरोप -


महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. सरकारमधील मंत्री स्त्रीलंपट आहे. त्यांची प्रकरणी बाहेर निघत आहे. मंत्र्याला गायब केले जात आहे. वाझेला पाठिशी घातले जात आहे. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारीच पोलिस दलात काहींनी चुका केल्याचे सांगत आहे, हे सर्व गंभीर असून यामुळे राज्याची बदनामी होत आहे. नैतिकतेच्या पातळीवर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत भाजपाने धुळ्यात महापालिकेनजीक शासनाच्या पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदविला.

राज्य सरकारविरोधात धुळ्यात भाजपाचे आंदोलन..

मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना सरकार पाठिशी घालतंय -
भाजपाचे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल म्हणाले की, अकार्यक्षम आघाडी सरकारने शेतकऱ्यांना लुबाडले आहे. वीज माफी देतो, असे सरकारने सांगितले. आता मात्र सर्वसामान्य ग्राहकांची वीज तोडली जात आहे. मुंडेंना पाठिशी घातले. पूजा चव्हाण प्रकरणात वादग्रस्त अधिकारी सचिन वाझेला सरकार पाठिशी घालत आहे. सरकारमधील मंत्र्यांची स्त्रीलंपट प्रकरणे बाहेर पडत आहेत. सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अग्रवाल यांनी केली आहे.

वाढत्या कोरोनाबद्दल शासनाकडून नियोजन नाही -

राज्यासह धुळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना शासनाकडून याबाबत कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. पोलीस दलातील मोठ्या अधिकाऱ्यानेच पोलिसांच्या वर्तणुकीवर भाष्य केले आहे. त्यामुळे शासनाची नव्हे; तर राज्याची बदनामी होत आहे. म्हणून शासनाने आपला कारभार सुधारावा. अन्यथा, धुळ्यासह राज्यभरात भाजपा नागरिकांच्या सह्यांची मोहिम घेऊन ती राज्यपालांना सादर करेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल म्हणाले.

यावेळी महानगरप्रमुख अनुप अग्रवाल यांच्यासह महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती संजय जाधव, सभागृहनेते राजेश पवार, चंद्रकांत गुजराथी, नगरसेवक हर्षकुमार रेलन, संजय पाटील, हिरामण गवळी, युवराज पाटील, संजय भिल, ओम खंडेलवाल, दगडू बागूल,भगवान देवरे, सागर चौधरी, सागर कोडगीर, विजय पाच्छापूरकर, नागसेन बोरसे, भिकन वराडे, मनोज शिरुडे, अमोल धामणे, माजी महापौर सौ जयश्री अहिरराव, मनपाच्या महिला बालकल्याण सभापती वंदना थोरात, नगरसेविका सौ. प्रतिभा चौधरी, सुनिता सोनार, पुष्पा बोरसे, मोनिका शिंपी, अमृता पाटील, मोहिनी गौड आदी उपस्थित होते.

हेही वाचा - मंत्रालयातील वीज पुरवठा सुरळीत; ७ मिनिटात पुरवठा पूर्वपदावर आणल्याचा बेस्टचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.