ETV Bharat / state

शिरपूर शहरात एकाच दिवशी 4 मोटारसायकली लंपास

author img

By

Published : May 21, 2020, 8:00 PM IST

dhule
एकाच दिवशी 4 मोटारसायकली केल्या लंपास

लॉकडाऊनचा फायदा घेत एका रात्रीत चोरट्यांनी चार मोटरसायकली लंपास केल्याची घटना शिरपूर शहरात आज (गुरुवार) घडली.

धुळे - लॉकडाऊनचा फायदा घेत चोरांनी चार मोटरसायकली लंपास केल्याची घटना शिरपूर शहरात आज (गुरुवार) घडली. हे सर्व चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. एकाच रात्रीत चार मोटरसायकलची चोरी झाल्याने शिरपुरात चोरट्यांची मोठी टोळी सक्रिय असल्याचे सांगण्यात येत आहे.

एकाच दिवशी 4 मोटारसायकली केल्या लंपास, घटना सिसिटीव्हीत कैद


धुळे जिल्ह्याच्या शिरपूर शहरातील भुपेशनगर येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर शिरपूर शहर तीन दिवस 'कंटेनमेन्ट झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे. यामुळे शहरातील काही भाग वगळता इतरत्र दिवसभर शांतता बघायला मिळत आहे. या शांततेचा फायदा घेत वरवाडे व केशरनगर येथून चार मोटरसायकलींची चोरी झाली. याबाबत शिरपूर शहर पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.

एकाच दिवशी 4 मोटारसायकली केल्या लंपास, घटना सिसिटीव्हीत कैद

वरवाडे येथील अशोक माळी आणि जयवंत बापू यांची मोटरसायकल चोरीला गेली आहे. तर केशरनगर येथील दोन मोटरसायकल चोरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोटरसायकल चोरी करणारे संशयीत सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले आहेत. यामध्ये चौघे जण बाईक घेऊन जात असल्याचे दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.