ETV Bharat / state

Utti Multipurpose Society Mismanagement : वादग्रस्त युक्ती केंद्राची अद्याप चौकशी नाही; 'बार्टी' महासंचालकांचे आश्वासन हवेतच

author img

By

Published : Nov 2, 2022, 7:57 PM IST

Dhammajyoti Gajbhiye
धम्मज्योति गजभिये

बार्टीअंतर्गत येणाऱ्या वादग्रस्त युक्ती मल्टीपर्पज सोसायटीच्या (Controversial maneuver center under investigation) प्रशिक्षण केंद्रामध्ये चालणारा भोंगळ कारभार (Utti Multipurpose Society mismanagement) ईटीव्ही भारतने समोर आणला होता. संचालिका अनुपमा बुजाडे यांनी जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना अनुपस्थित दाखवून त्यांचे मानधन रोखल्याचा (students emoluments withheld) गंभीर आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी बार्टी (बाबासाहेब रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) चे राज्याचे महासंचालक धम्मज्योति गजभिये यांनी चौकशी (barty enquiry) करण्याचे आश्वासन दिले. Chandrapur News

चंद्रपूर : बार्टीअंतर्गत येणाऱ्या वादग्रस्त युक्ती मल्टीपर्पज सोसायटीच्या (Controversial maneuver center under investigation) प्रशिक्षण केंद्रामध्ये चालणारा भोंगळ कारभार (Utti Multipurpose Society mismanagement) ईटीव्ही भारतने समोर आणला होता. संचालिका अनुपमा बुजाडे यांनी जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना अनुपस्थित दाखवून त्यांचे मानधन रोखल्याचा (students emoluments withheld) गंभीर आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी बार्टी (बाबासाहेब रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) चे राज्याचे महासंचालक धम्मज्योति गजभिये यांनी चौकशी (barty enquiry) करण्याचे आश्वासन दिले. मात्र 15 दिवस लोटूनही अद्याप या प्रकरणाची कुठलिही चौकशी करण्यात आलेली नाही. त्यामुळे वरपासून खालपर्यंत बार्टीचा भोंगळ कारभार कसा सुरू आहे याची प्रचिती येत आहे. या दरम्यान अनुसूचित जातीतील 35 गरीब विद्यार्थी अद्यापही मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. Chandrapur News



संचालिकेवर विद्यार्थ्य्यांचे मानधन रोखण्याचा आरोप- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बार्टी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली. येथील केंद्रात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण दिले जात असून विद्यार्थ्यांना दर माह सहा हजार याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता दिला जातो. चंद्रपुरात युक्ती मल्टीपर्पज सोसायटीला हे केंद्र देण्यात आलेले आहे. संचालिका अनुपमा बुजाडे या जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांचे मानधन रोखतात, त्यांना मानसिक त्रास देतात, त्यांना धमकावतात. फेब्रुवारी ते ऑगस्ट यादरम्यान झालेल्या प्रशिक्षण वर्गातील 150 पैकी 35 जणांना गैरहजर असल्याचे दाखवून त्यांचे मानधन रोखण्यात आलेले आहे. भुजाडे यांच्या विरोधात जाऊन निरोप समारंभ आयोजित केला याचा वचपा काढण्यासाठी बुजाडे यांनी एका विद्यार्थ्याचे 36 हजार याप्रमाणे 35 जणांचे मानधन रोखले असा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

दोषींवर कारवाईचे आश्वासन - 12 ऑक्टोबरला हा प्रकार ईटीव्ही भारतने समोर आणला. 15 ऑक्टोबरला या केंद्रात कागदावर चालू आणि प्रत्यक्षात बंद असणाऱ्या सीसीटीव्ही आणि बायोमेट्रिक मशीनबाबत चालणाऱ्या भोंगळ कारभाराबाबत वृत्त प्रकाशित झाले. यानंतर राज्याचे बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये यांनी याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन ईटीव्ही भारतला दिले होते. आज 15 दिवस लोटूनही पीडित विद्यार्थ्यांची साधी विचारणा करण्यात आलेली नाही. त्या काळात झालेली सीसीटीव्हीची रेकॉर्डिंग, बायोमेट्रिक मशीन याची तपासणी झाली नाही. स्वतः महासंचालकच पीडित विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये याबाबत उदासीन आहेत तर या विद्यार्थ्यांनी दाद मागायची तरी कुठे असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे.


युक्तीची वादग्रस्त पार्श्वभूमी आणि बार्टीचे 'मॅनेजमेंट' - युक्ती मल्टीपर्पज सोसायटीच्या बार्टी प्रशिक्षण केंद्राचा आजवरचा दहा वर्षांच्या प्रवास हा अत्यंत वादग्रस्त राहिलेला आहे. संचालिका अनुपमा भुजाडे यांच्याकडून तिथे चालणाऱ्या भोंगळ कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष केले जाते. त्यांना मानसिक त्रास दिला जातो, त्यांची पिळवणूक केली जाते. अशा तक्रारी यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. मात्र समाजकल्याण विभागाकडून त्यांना बार्टी हे आमच्या अधिकारात येत नाही तक्रार करायची असेल तर थेट पुण्यात करा असे सांगण्यात येते. यामुळे हतबल झालेले विद्यार्थी पुढे रितसर तक्रार करण्याचे सोडून देतात. मागच्या दहा वर्षांत अनेकदा अशा घटना घडल्या आहेत, ज्या नंतर बार्टीकडूनच 'मॅनेज' केल्या जातात. युक्तीच्या नागपूर बार्टी केंद्रात एका विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाण करण्यात आली, शिक्षकांच्या पगारातून कमिशन घेतले जाते असे आरोप झाले मात्र पुढे हे प्रकरण आपोआप मॅनेज झाले. मात्र यावेळी काही विद्यार्थ्यांनी धाडस दाखवत यावर प्रतिक्रिया दिल्या आणि प्रकरण समोर आणले.



कागदावर सगळं - युक्तीच्या प्रशिक्षण केंद्रात कागदावर सगळं ok दाखविण्यात येतं. हे केंद्रच मुळात एका खासगी शाळेच्या वर उभारण्यात आले आहे. एखाद्या शाळेच्या वरच्या जागेचा व्यावसायिक उपयोग होऊ शकतो का ही महत्त्वाची बाब आहे. ईटीव्ही भारतने या ठिकाणी भेट दिली असता संपूर्ण केंद्राचा सावळागोंधळ उजेडात आला. सीसीटीव्ही कॅमेरे बंद आणि त्यात बिघाड होता, नियमित रेकॉर्डिंग केली जात नव्हती, बायोमेट्रिक मशीन अत्यावश्यक असताना ती धूळ खात पडलेली होती, तक्रारपेटी उघडी होती. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार बिनधास्तपणे सुरू होता. विशेष म्हणजे या केंद्राची पाहणी करण्याच्या सूचना जातपडताळणी विभाग तसेच समतादूतांना देण्यात येते. मात्र त्यांनी कधी यावर आक्षेप घेतला नाही. ते कागदावर सर्व ok दाखवतात. आम्हाला ज्या सूचना बार्टीकडून मिळतात त्यानुसारच आम्ही सर्व पडताळणी करतो आणि तसा अहवाल पाठवतो असे जातपडताळणी विभागाचे वाकुलकर यांचे म्हणणे आहे. मात्र,
इतक्या गंभीर बाबी ईटीव्ही भारतने समोर आणल्या असता महासंचालक गजभिये चौकशी करणार असे म्हणाले मात्र 15 दिवस लोटून चौकशी झाली नाही. जर राज्याचे महासंचालक अशा गंभीर प्रकरणात उदासीन असतील तर पीडित विद्यार्थ्यांनी नेमके जायचे कुठे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

21 सप्टेंबरच्या वर्गाची 25 पासून मशीन सुरू - बायोमेट्रिक मशीन ही सर्व केंद्रात सक्तीची आहे. 21 सप्टेंबरपासून नव्या प्रशिक्षण वर्गाला सुरुवात झाली मात्र बायोमेट्रिक मशीन ही 25 सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांना सुरू करून देण्यात आली. 'युक्ती'कडून असे प्रकरण सहज मॅनेज केले जातात. आता यावेळी ह्याची चौकशी होते की पुन्हा कागदावर ok दाखविण्यात येते याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.