ETV Bharat / state

अखेर सहा वर्षानंतर चंद्रपूरची दारूबंदी उठवली, वडेट्टीवार म्हणाले . . .

author img

By

Published : May 27, 2021, 7:49 PM IST

Updated : May 28, 2021, 4:33 PM IST

Chandrapur's liquor ban has been lifted
चंद्रपूरची दारूबंदी उठवली

चंद्रपूरची दारूबंदी उठवण्यात आली आहे. या बाबत झा समितीने दिलेल्या अहवालानुसार निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूर/चंद्रपूर - 2015 पासून सुरू असलेली चंद्रपूर जिल्ह्यात असलेली दारूबंदी अखेर उठवण्याचा मोठा महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सनदी अधिकारी झा समितीच्या अहवालावरून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली. ते नागपुरात विभागीय आयुक्त कार्यालयात बोलत होते.

चंद्रपूरची दारूबंदी उठवली

1 एप्रिल 2015ला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा मोठा निर्णय राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला होता. देवतळे समितीच्या अहवालावरून हा निर्णय घेण्यात आला होता. यात आघडी सरकार आल्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती झाल्यानंतर अडीच लाखा पेक्षा जास्त लोकांची निवेदने दारूबंदी उठवण्यासाठी आली होती.

'झा समितीच्या अहवालावरून दारू बंदी उठली'

यात सनदी अधिकारी झा यांच्या नेतृत्वात समिती तयार करून अहवाल मागवला होता. या अहवालात अवैध दारू विक्रीत वाढ झाली, क्राईमच्या घटनेत वाढ झाल्याचे पुढे आले. यात 4 हजार 42 गुन्हे हे महिलांवर दाखल झाले आहे. 300पेक्षा जास्त दारू विक्रीचे गुन्हे बालकांवर दाखल झाले होते. या सगळ्या धक्कादायक बाबी झा समितीच्या अहवालात पुढे आल्या आहेत. यासोबत अनेक दुष्परिणामसुद्धा दसरूबंदी नंतर पुढे आले असल्याचेही ते म्हणाले. अवैध दारूमुळे धोका निर्माण झाला होता.

'केंद्रासरकार महाराष्ट्रासोबत सापत्न वागणूक करत आहे'

महाराष्ट्रा संदर्भात पंतप्रधानाची भूमिका राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगावी. केंद्रासरकार महाराष्ट्रासोबत सापत्न वागणूक करत असल्याचे म्हटले तर आमच्यावर खोटे आरोप करण्यात आले. गुजरातला दौरा करून त्तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसान झाले म्हणून 1हजार कोटी न मागता दिले आहे. कुठलेही पंचनामे नाही जाऊन घोषणा केली आणि पैसे पण दिले.

'केंद्राला पैसे मागून एक फुटी कवडी दिली नाही'

महाराष्ट्राला फुटी कवडी दिली नाही. बंगालमध्ये जातील ओरीसाला जातील, आमची मागणी आहे, कोकणात येऊन पाहणी करावी आणि मदत द्यावी, आज महाराष्ट्र सरकारने 252 कोटीचे पॅकेज घोषित केले. एनडिआरएफच्या निकषानुसार 72 कोटीचे नुकसान झाले होते. मात्र, तरीही राज्यसरकारने अधिकची मदत दिली. पंतप्रधानांना विनंती आहे, विरोधी पक्षानेही पंतप्रधानांना विनंती करून महाराष्ट्राकडे लक्ष द्यावे, अशी विनंती केली आहे.

'लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील'

लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री बैठक घेतील. अनेक जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झाली असली तरी रेड झोनमध्ये आहे. 64 हजारच्या घरात सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे अभ्यास करून टप्प्या टप्प्याने हे लॉकडाऊन कमी करण्यासाठी तज्ज्ञ लोकांच्या सोबत चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

Last Updated :May 28, 2021, 4:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.