ETV Bharat / state

बुलडाण्यातील केळवद स्‍टेट बँक शाखेत दरोडा; २० लाखांची रोकड लंपास

author img

By

Published : Oct 31, 2021, 3:13 AM IST

State Bank of india Branch Kelwad robbery
State Bank of india Branch Kelwad robbery

चिखली तालुक्यातील केळवद येथील भारतीय स्‍टेट बँकेच्‍या शाखेवर शनिवारी 30 ऑक्टोबरच्या मध्यरात्री दरोडा पडल्याची घटना घडली. सकाळी शिपाई बँकेत आल्यानंतर बँकेत दरोडा पडला आहे. जवळपास २० लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

बुलडाणा - चिखली तालुक्यातील केळवद येथील भारतीय स्‍टेट बँकेच्‍या शाखेवर शनिवारी 30 ऑक्टोबरच्या मध्यरात्री दरोडा पडल्याची घटना घडली. सकाळी शिपाई बँकेत आल्यानंतर बँकेत दरोडा पडला आहे. जवळपास २० लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरोड्याची माहिती मिळताच बुलडाणा येथून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्‍थळी दाखल झाले असून श्वानपथकाद्वारे दरोडेखोरांचा माग काढण्यात येत आहे.

State Bank of india Branch Kelwad robbery
केळवद स्‍टेट बँक शाखेत दरोडा
दरोडेखोरांनी गॅस कटरने कापली तिजोरी -
चिखली तालुक्यातील केळवद गावात किन्‍होळा रोडवर भारतीय स्‍टेट बँकेची शाखा आहे. शाखेचे खिडकीचे गज वाकवून दरोडेखोर बँकेत शिरले व बँकेतील तिजोरी गॅस कटरने कापून रोकड नेली.


हे ही वाचा -देशात पैसेवाल्यांचेच खटले चालतात आणि जामीनही त्यांनाच मिळतो - असदुद्दीन ओवैसी

घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल -

जेव्हा सकाळी शिपाई बँकेत आला तेव्‍हा खिडकीचे गज वाकवलेले गेल्याचे पाहून त्‍याला चोरीचा संशय आला आणि त्‍याने बँकेच्या अधिकाऱ्यांना कळवले. अधिकाऱ्यांनी बँकेत येत पाहणी करून तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्‍यानंतर घटनास्‍थळी बुलडाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते, चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक लांडे हेही घटनास्‍थळी आले आहेत. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. श्वानाने बँकेच्‍या बाजूच्‍या शेतापर्यंत माग काढला. तिथे दरोडेखोरांचे हँडग्‍लोज व बॅटरी मिळून आली. सीसीटीव्‍हीत दरोडेखोर कैद झाल्याची शक्‍यता असून सीसीटीव्‍हीचे फूटेज तपासले जात आहेत. तिजोरीतून जवळपास 20 लाख रुपये चोरून नेल्याची माहिती आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.