ETV Bharat / state

Samruddhi Highway Working Laborers Protest : 5 महिन्यापासून मजूरी नाही, समृद्धी महामार्गावर मजुरांचे आंदोलन

author img

By

Published : Jan 3, 2023, 2:06 PM IST

Samruddhi Highway Working Laborers Protest
समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांचा निषेध

समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या 300 मजुरांना त्यांची मजुरी 5 महिन्यापासून मिळाली (Protest due to not getting wages) नाही. रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंपनीमार्फत हजारो मजूर काम करीत होते. कामाचे पैसे मिळण्यासाठी आता मजूरांनी आंदोलन सुरू केले (Samruddhi Highway Working Laborers Protest) आहे. हे सर्व मजूर मध्यप्रदेशातील (laborers Protest not getting wage) आहेत.

समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांचा निषेध

बुलढाणा : राज्यातील सर्वात महत्वाच्या स्वर्गीय बाळासाहेब समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार (Samruddhi Highway Working Laborers Protest) पडले. हा महामार्ग लाखो कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे. महामार्गामुळे नागपूर मुंबई जवळ आले आहेत. रस्त्यावरून वाहनेसुद्धा सुसाट धावायला लागले आहेत. मात्र हा रस्ता तयार करणारे तढेगांव कॅम्पमधील 300 मजुरांना त्यांची मजुरी तब्बल 5 महिन्यापासून मिळाली नाही. हे सर्व मजूर मध्यप्रदेशातील असून या मजुरांचे परिवार हैरान झाले आहे. मजुराच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. आता मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून कंपनी विरोधात हल्लाबोल सुरु केला (not getting wages for 5 months) आहे.


ठिय्या आंदोलन : रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंपनीमार्फत हजारो मजूर समृद्धी मार्गावर काम करीत (laborers Protest not getting wage) होते. दिवसरात्र काम करून सुद्धा त्यांच्या घाम गाळलेल्या कामाचा मोबदला दिल्या जात नसल्याने 300 मजुरानी किनगावराजा पोलीसात तक्रार देण्यासाठी 15 किमी पायी जाऊन प्रयत्न केला. मात्र राहेरी नदी पुलावर हा मजुराचा मोर्चा पोलीसांनी अडविला. कंपनीच्या जबाबदार व्यक्तीशी चर्चा करण्यात आली. पुढील आठवड्यात या मजुरांच्या खात्यात त्यांचे वेतन दिल्या जाईल, असे सांगण्यात आले. मात्र मजुरानी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत आमच्या मजुरीचे पैसे मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका मजुरांनी घेतली (Protest due to not getting wages) आहे. या महामार्गामुळे नागपूर मुंबई जवळ आले आहेत, अंतर कमी झाले आहे. समृद्धी महामार्गावर मजुरांचे आंदोलन सुरू आहे.



केव्हा मजुरी मिळेल ? कंपनीचे जे. पी. सिंग यांच्या चर्चा केली असता त्यांनी एमएसआरडीसीने अद्याप पर्यंत पैसे न दिल्याने मजुराचे पैसे देता आले (Samruddhi Highway Working Laborers) नाही, असे कबूल केले आहे. त्यामुळे या 300 मजुरांचे अडीच करोड रुपये देणे बाकी असल्याचे ही सिंग यांनी सांगितले आहे. मजुरांनी थोडा धीर धरावा, असे सिंग यांचे म्हणणे आहे. पुढील आठवड्यात मजुरांच्या खात्यात त्यांची रक्कम जमा होईल, असे त्यांनी आश्वासन दिले आहे. आता समृद्धी महामार्गावर केलेल्या या 300 मजुरांना केव्हा मजुरी मिळेल, याकडे मजुरांच्या कुटुंबाचे लक्ष लागले (Samruddhi highway working laborers wages) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.